ETV Bharat / state

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; स्फोटात चार जण गंभीर, हादऱ्यानं 4 ते 5 घरं जमीनदोस्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 12:29 PM IST

Cylinder Blast In Chembur : चेंबूर परिसरात असलेल्या कॅम्प इथल्या एका घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी 11 नागरिकांची सुटका केली आहे.

Cylinder Blast In Chembur
सिलेंडर स्फोट झालेलं घटनास्थळ

मुंबई Cylinder Blast In Chembur : घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन 4 ते 5 घरं जळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चेंबूर परिसरात कॅम्प इथं आज सकाळी घडली. या सिलिंडर स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. सविता अंभोरे ( वय 47 वर्षे ) रोहित अंभोरे ( वय 29 वर्षे) विकास अंभोरे ( वय 50 वर्षे ) अशोक अंभोरे ( वय 27 वर्षे ) अशी सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची नावं आहेत. तर इमारतीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी 11 जणांची सुटका केली आहे.

घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट : चेंबूरमधील कॅम्प परिसरातील घरात गॅस सिलिंडरचा आज सकाळी भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटाच्या हादऱ्यामुळं आजुबाजूची 4 ते 5 घरे जमीनदोस्त झाली आहेत. यावरुन हा स्फोट किती मोठा होता, याबाबतचा अंदाज येतो. या स्फोटाची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या 11 जणांची सुखरुप सुटका केली आहे.

आगीतून 11 नागरिकांची सुटका, चार जखमी : या सिलेंडर स्फोटात एकाच कुटंबातील 4 जण जखमी झाले आहेत. यात सविता अंभोरे ( वय 47 वर्षे ) रोहित अंभोरे ( वय 29 वर्षे) विकास अंभोरे ( वय 50 वर्षे ) अशोक अंभोरे ( वय 27 वर्षे ) यांचा समावेश आहे. जखमी नागरिकांवर गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा स्फोट कोणत्या कारणामुळं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूतील चार ते पाच घरं पडली असून, मोठा हादरा बसल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.

सिलेंडर स्फोटात 4 ते 5 घरे जमीनदोस्त : चेंबूर परिसरात झालेल्या सिलेंडरच्या भीषण स्फोटानं परिसरात चांगलाच हादरा बसला आहे. या हादऱ्यामुळं आजुबाजूची 4 ते 5 घरं जमीनदोस्त झाली आहेत. यावरुन हा स्फोट किती मोठा होता, याचा अंदाज येतो. या स्फोटाची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर दाखल होत बचावकार्य सुरू केलं आहे.

हेही वाचा :

  1. Gas Cylinder Explosion : गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार जण होरपळले; 16 जण जखमी
  2. Gas Cylinder Explosion: गॅस सिलिंडरच्या स्फोटात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू
  3. Cylinder Blast : सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे नागरी वस्तीत स्फोट; ९ जण जखमी, ७ घरांची पडझड... पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.