ETV Bharat / state

मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 9:21 PM IST

Cyber Fraud Case : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीश रमेश देवकीनंदन धनुका (वय 62) यांना सायबर चोरट्याने पॅन कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली लिंक पाठवून 50 हजारांना गंडा घातला आहे. (Ex convict Ramesh Dhanuka) याप्रकरणी सोमवारी कुलाबा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fraud by sending links)

Cyber Fraud Case
सायबर घोटाळा प्रकरण

मुंबई Cyber Fraud Case : कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले की, सोमवारी सेवानिवृत्त न्यायधीश रमेश धनुका यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले रमेश धनुका हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. (Cyber Fraud With Chief Justice) ते कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीत गेल्या पंचवीस वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहतात. सध्या धनुका हे कायदा सल्लागार म्हणून काम करत आहेत. 27 नोव्हेंबरला दुपारी सव्वातीन ते चार वाजण्याच्या दरम्यान धनुका यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून तुमचे एसबीआय योनो अकाउंट आज डिऍक्टिव्हेट होईल. तुम्ही तुमचा पॅन कार्ड अपडेट करा अशा मेसेजसह एक लिंक पाठवण्यात आली होती. हा मेसेज एसबीआयकडून पाठवण्यात आला असल्याचं भासवण्यात आलं होतं. या मेसेजमध्ये नमूद केलेल्या लिंकवर धनुका यांनी क्लिक केलं असता ती ओपन झाली. लिंक क्लिक करताच त्यावर एका रकान्यामध्ये धनुका यांनी पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत सूचना वाचली आणि रकान्यामध्ये त्यांनी त्यांचा पॅन कार्ड क्रमांक भरून सबमिट केला.

थेट बॅंक प्रतिनिधीचाच आला फोन : पॅन कार्ड क्रमांक सबमिट करताच रमेश धनुका यांना तात्काळ बँकेमधून प्रतिनिधीचा फोन कॉल आला आणि तुम्ही 49 हजार 998 एवढ्या रकमेचे व्यवहार केले आहेत का अशी विचारणा झाली. मात्र, मी असा कोणताही व्यवहार केलेला नाही असे धनुका यांनी बँक प्रतिनिधीला सांगितले. तेव्हा बँक प्रतिनिधीने धनुका यांना त्यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातून 49 हजार 998 एवढी रक्कम डेबिट झाल्याचे सांगितले आणि बँक प्रतिनिधीने तत्काळ इंटरनेट सेवा पुरवणारं SBI योनो युजर आयडी डीऍक्टिव्हेट केलं. तसेच 1930 या क्रमांकावरून सायबर पोर्टल ऑनलाईन तक्रार नोंदवण्याबाबत बँक प्रतिनिधींनी धनुका यांना सुचवले.

माजी न्यायाधीशांकडून तक्रार दाखल : धनुका यांनी 1930 या क्रमांकावर सायबर पोर्टलला ऑनलाइन तक्रार नोंद केली आणि दुसऱ्या दिवशीच 28 नोव्हेंबरला कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल करण्यासाठी धनुका यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले असता धनुका 18 डिसेंबरला कुलाबा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. प्रसिद्ध कलाकारांच्या पेटिंग्जच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंट बँकरला घातला 17 कोटींचा गंडा
  2. राजस्थानच्या व्यवसायिकाला शेअर मार्केट सल्लागार असल्याचं सांगून १ कोटीला घातला गंडा
  3. फोटो काढायला गेली अन् अवघ्या दोन सेकंदात दागिन्यांची पर्स लंपास, वऱ्हाडी बनून आलेल्या चोराचा प्रताप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.