ETV Bharat / state

राजस्थानच्या व्यवसायिकाला शेअर मार्केट सल्लागार असल्याचं सांगून १ कोटीला घातला गंडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 5:48 PM IST

Fraud News
आर्थिक फसवणूक

Fraud News : ऑनलाइन माध्यमातून लोकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईत राजस्थानमधील एका व्यावसायिकाला शेअर मार्केटचा अधिकृत सल्लागार असल्याचं भासवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई Fraud News : काही अज्ञात लोकांनी राजस्थानमधील एका व्यावसायिकाला शेअर मार्केटचा अधिकृत सल्लागार असल्याचं भासवून 1.07 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केली. आरोपींनी फिर्यादीला अधिक नफा कमावण्याची आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तसेच माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) (Mata Ramabai Ambedkar Marg) मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनावडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. हे आरोपी मुंबईतीलच असून पुढील तपास सुरू आहे.

अशी केली बतावणी : माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदलाल सैनी (वय 37) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत जून महिन्यात आशिष दुबे नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितलं की, तो अश्विनी सोल्युशन कन्सल्टन्सीमध्ये एक सल्लागार आहे. ज्यांचे कार्यालय दलाल स्ट्रीट फोर्टमध्ये आहे. तसेच दुबे याने सैनी यांना सांगितलं की, त्यांची कंपनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (NISM) मध्ये नोंदणीकृत आहे. दुबे यांनी सैनी यांना त्यांच्या कंपनीच्या F-O च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, अशी बतावणी केली.


बँक खात्यात जमा केले 3.15 लाख रुपये : जेव्हा सैनी गुंतवणूक करण्यास तयार झाले, तेव्हा त्यांना अश्विनी सोल्यूशन (प्रीमियम) नावाच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर सैनी यांनी M/s अश्विन सोल्युशनच्या बँक खात्यात 3.15 लाख रुपये जमा केले. यानंतर, सैनी यांचे डिमॅट खाते M/S एलिस ब्लू फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये उघडण्यात आले होते. यानंतर सैनी यांना m यांनी दुबे याच्या सूचनेनुसार ट्रेडिंग सुरु केले होते.



68 लाख रुपयांचं नुकसान : दुबे यांच्या सांगण्यावरून सैनी यांनी २० लाख रुपये गुंतवले होते. पैसे गुंतवल्यानंतर दुबेने आपले नुकसान झाल्याचं आशिषला सांगितलं आणि नुकसान भरून काढलं जाईल असं सांगून त्याने सैनी यांना पुन्हा २० लाख रुपये गुंतवायला लावले होते. यानंतर सैनी यांनी ट्रेडिंग सुरू केलं होतं. या काळात दुबेने सैनी या फोनद्वारे सीई आणि पीई (सीई म्हणजे कॉल ऑप्शन आणि पीई म्हणजे पुट ऑप्शन) ट्रेडिंग करण्यास सांगितलं होतं. या ट्रेडिंगमध्ये सैनी यांना 48 लाख रुपयांचं नुकसान झालं आणि त्यामुळं सप्टेंबरपर्यंत सैनी यांना 68 लाख रुपयांचं नुकसान झालंय.


ट्रेडिंग केलं बंद : 68 लाखांचे नुकसान झाल्यानंतर सैनी यांनी दुबे यांच्या सांगण्यावरून ट्रेडिंग बंद केलं. 5 ते 6 दिवसांनंतर सैनी यांना रवी पटेल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ज्याने सैनी यांना सांगितलं की, स्टॉक मार्केटमध्ये झालेले नुकसान भरून काढू. पटेल यांनी सैनी यांना प्रशांत नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं. प्रशांतने सैनी यांना सांगितलं की, दलाल स्ट्रीटवर त्याचे कार्यालय आहे आणि तेथून तो व्यापार करतो. प्रशांतने सैनी यांना तो गुंतवलेल्या रकमेच्या १० पट ट्रेडिंग लिमिट देऊ असं आश्वासन दिलं. जेव्हा प्रशांतने सैनी यांना ट्रेडिंग लिमिटच्या 10 पट देण्यास सांगितलं. तेव्हा सैनी यांनी प्रशांतच्या सल्ल्यानुसार प्रत्येकी 50 हजार रुपये दोन वेळेस गुंतवले.

आणखी चार लाख रुपये देण्यास सांगितलं : प्रशांतने सैनी यांना ट्रेडिंगसाठी ऑपरेटर कबीरच्या संपर्कात राहण्यास सांगितलं. काही दिवसांनंतर प्रशांतने सैनी यांना सांगितलं की, आपल्याला 1 कोटी रुपयांची मर्यादा देण्यात आली होती, त्यापैकी 48 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशांतने सैनी यांना ४८ लाख रुपये देण्यास सांगितलं. यानंतर तडजोडीच्या नावाखाली प्रशांतने सैनी यांना ३६ लाख रुपये दिले, जे सैनी यांनी प्रशांतने दिलेल्या बँक खात्यात जमा केले. काही दिवसांनी प्रशांतने सैनी यांना आणखी चार लाख रुपये देण्यास सांगितलं.

यांच्यावर केला गुन्हा दाखल : पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, सतत पैशांच्या मागणीमुळं सैनीला संशय आला आणि नंतर त्याने आशिष दुबे आणि रवी पटेल यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. त्यांनी नमूद केलेली कंपनी तेथे अस्तित्वात नसल्याचं आढळलं. पुढे पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, सैनी यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली या चौघांना अनेक वेळा एकूण 1.07 कोटी रुपये दिले. आपली फसवणूक झाल्याची खात्री सैनी यांना झाल्यावर त्यांनी एमआरए मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. सैनी यांच्या तक्रारीवरून, पोलीस आशिष दुबे, रवी पटेल, प्रशांत, कबीर आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३४, ४०६,४०९,४२० आणि १२०(बी) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा
  2. Cyber Crime Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 8 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये कोट्यवधींचा गंडा
  3. सोशल मीडियातील जाहिरातींपासून सावध! ढोंगी ज्योतिषी बनून महिलेला घातला 16 हजारांचा गंडा, जळगावमधून दोघांना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.