ETV Bharat / state

Airbus Project : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर - उदय सामंत

author img

By

Published : Oct 28, 2022, 7:14 AM IST

ठाकरे सरकारमुळेच ( Thackeray government ) एअरबस प्रकल्प राज्यातून ( Airbus project to Gujarat ) गेला असा आरोप ( Airbus project out of Maharashtra ) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( State Industries Minister Uday ) यांनी केला आहे.

State Industries Minister Uday
उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई - : ठाकरे सरकारमुळेच ( Thackeray government ) एअरबस प्रकल्प राज्यातून ( Airbus project to Gujarat ) गेला असा आरोप ( Airbus project out of Maharashtra ) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( State Industries Minister Uday ) यांनी केला आहे. विरोधक टीका करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप देखील त्यांनी केला. एक वर्षापूर्वीच हा प्रकल्प त्या ठिकाणी नेण्याचा निर्णय कंपन्याने घेतला होता अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, आम्ही प्रयत्न करू मागच्या सरकारमध्ये कोणीही हा प्रकल्प परत येण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत असे देखील सांवत म्हणाले. ज्यांनी हा प्रकल्प परत आणण्यास प्रयत्न केले नाहीत त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे अवाहन त्यांनी केले.

उदय सामंत
वेदांत असेल किंवा हा प्रकल्प ( Vedanta Foxconn Project ) असेल हा या आधीच्या सरकारमध्येच गेलेले आहेत. ते आत्ताच्या सरकारमध्ये गेलेले नाहीत. याबाबत आम्ही पुरावे सादर करू शकतो असे सावंत म्हणाले. हे प्रकल्प जरी बाहेर गेले असले तरी, आम्ही युवा पिढीला वाऱ्यावर सोडणार नाही. युवकांना रोजगार देणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. मोठा प्रकल्प महाराष्ट्रमध्ये पुढील वर्षी आणला जाईल. बेरोजगारी दूर करण्याचा कायम आमचा प्रयत्न राहणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देण्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांचा असेल.

काय आहे एअरबस प्रकल्प? गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी गुजरातला मोठी भेट मिळाली आहे. C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती वडोदरात होणार आहे. हा प्रकल्प 'मेक इन इंडिया' देशांतर्गत विमान निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (IAF) वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,000 कोटी आहे.

8 सप्टेंबर 2021 ला झाला होता करार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे होणाऱ्या समारंभात उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने 08 सप्टेंबर 2021 रोजी M/s Airbus Defence and Space SA, स्पेन कडून 56 C-295 MW वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. 24 सप्टेंबर 2021 रोजी, संरक्षण मंत्रालयाने मेसर्स एअरबस डिफेन्स, स्पेस SA यांच्याशी संबंधित उपकरणांसह विमानाच्या संपादनासाठी करार केला.

संरक्षण सचिवांनी दिली संपूर्ण माहिती - संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही माहिती देतांना सांगितले की, "सी-२९५ विमानांची निर्मिती युरोपबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकल्पाअंतर्गत एका खाजगी कंपनीद्वारे लष्करी विमान भारतात तयार केले जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹२१,९३५ कोटी आहे. विमानाचा वापर नागरी कारणांसाठीही केला जाऊ शकतो." या प्रकल्पाद्वारे हवाई दलाला एअरबस कंपनी सी-295 ची 56 मध्यम-लिफ्ट लष्करी वाहतूक विमाने मिळतील, त्यापैकी 16 विमाने थेट एअरबसकडून खरेदी केली जातील, उर्वरित 40 टाटाअ‍ॅडव्हान्ससह भारतात बांधली जातील.

विमानाची वैशिष्ट्ये - C-295 विमान सुमारे 6 टन पेलोड वाहून नेऊ शकते. तसेच सुमारे 11 तास उड्डाण करू शकते. एअरबस कंपनीच्या म्हणण्यानुसार, C295 विमान युद्धभूमीवर एकाच वेळी 71 सैनिक किंवा 50 पॅराट्रूपर्स वाहून नेण्यास सक्षम आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेली मध्यम वजनाची Avro विमाने खूप जुनी आहेत, त्यांची जागा C-295 विमानांनी घेतली जाईल.

एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांची टीका - राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ ( Vedanta Foxconn Project ) आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला ( Airbus project to Gujarat ) गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली ( Aditya Thackeray criticized the rulers ) आहे. ते म्हणाले की, आम्ही सातत्याने या घटना बाह्य सरकारला सांगत होतो की, एअर बस हा प्रकल्प राज्यातून निघून जाईल.

राज्यात बेरोजगार नाही का? - राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ ( Vedanta Foxconn Project ) आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला ( Airbus project to Gujarat ) गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली ( Aditya Thackeray criticized the rulers ) आहे. ते म्हणाले की, आम्ही सातत्याने या घटना बाह्य सरकारला सांगत होतो की, धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. मला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, राज्यात तरुण हुशार बेरोजगार नाही का? ज्यांना रोजगार पाहिजे. देशभरातील जे तरुण कामाच्या निमित्ताने आशेवर येणार आहे. त्यांचा काय होणार? हा चौथा प्रकल्प आहे जो राज्यातून निघून गेला आहे. याचा उत्तर कधीना कधी द्यावाच लागणार आहे असे, यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.