ETV Bharat / state

Jalna Crime News: बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरानं केल धक्कादायक कृत्य, एक जण ताब्यात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:35 PM IST

Jalna Crime News
बकरी चोरांनी जाळली कार

Jalna Crime News: दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. पण जालना जिल्ह्यात चोरट्यांचा बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसलाय. नक्की प्रकरण काय आहे, त्यांनी का कार जाळून पळून जाण्याचा प्रयत्न केला, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Bhokardan goat thief)

बकरी चोरांनी जाळली कार

जालना Jalna Crime News : भोकरदन तालुक्यातील निमगाव गावाजवळ चोरट्यांचा बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसलाय. गावकऱ्यांना घाबरून उलट चोरट्यांनी स्वतःची गाडी पेटवून देत पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. परंतु काही शेतकऱ्यांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. साहील मुकार शहा, असं त्या बकरी चोराचं नावं आहे. भोकरदन तालुक्यात बकऱ्या चोरीच्या घटनेत वाढ झालीय. (Bhokardan goat thief)

'अशी' घडली घटना : आज सकाळी हसनाबादकडून तीन बकऱ्या चोर पाच ते सहा बकऱ्या चोरून त्या कारमध्ये कोंबून भोकरदनकडे निघाले होते. रस्त्यात निमगाव गावाजवळ त्यांची गाडी पंक्चर झाली. त्यामुळं या चोरट्यांनी बकऱ्या गाडीतून बाहेर काढल्या. या चोरट्यांना परिसरातील काही शेतकरी व ग्रामस्थांनी विचारणा केली. गावकऱ्यांना संशय असल्यानं त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. घाबरलेल्या चोरांनी स्वतःची गाडी पेटवून देत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परतू गावकऱ्यांनी पाठलाग करून एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. त्याच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर इतर दोन चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.


तीन अनोळखी इसम : भोकरदन शहरातील निमगांव शिवारात राहणारे गजानन नाना सहाणे वय 42 हे आज सकाळच्या सुमारास गावातील हसनाबाद ते भोकरदन मार्गे जाणाऱ्या रोडवर उभे होते. त्यादरम्यान तिथे एक पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट कार पंक्चर झालेली होती. त्यामुळं गजानन यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता, त्या कारमध्ये तीन अनोळखी इसम दिसले. ते तिघे कारमधुन तीन बकऱ्या, तीन लहाण बोकड बाहेर काढत होते. गजानन यांना संशय आला त्यानंतर त्यांनी गावातील काहींना बोलून घेतले. गावकऱ्यांनी त्या तीन अनोळखी इस्मांना पकडुन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) रईस सरदार शहा 2) ईसा अहमद शहा 3) साहील मुक्तार शहा (वय 19 वर्षे रा. सिरसगाव मंडप ता. भोकरदन ह.मु. हसनाबाद ता. भोकरदन) असल्याचं समजलं.

बकऱ्या चोरून आणल्याचा संशय : दरम्यान या ठिकाणी गावातील बरेच लोक जमा झाले. त्या तिघांना बकऱ्यांबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावरून गावकऱ्यांना बकऱ्या चोरून आणल्याचा संशय आला. गावकऱ्यांनी त्या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिघांपैकी 1) रईस सरदार शहा व 2) ईसा अहमद शहा हे गर्दीचा फायदा घेवुन तेथून एका मोटारसायकलवर पळून गेले. तर साहील मुकार शहा यास गावकऱ्यांनी पकडले. त्याच्या ताब्यातील तीन बकऱ्या व तीन लहान बोकड पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या बकऱ्यांची एकूण किंमत 30 हजार रुपये आहे. याप्रकरणी साहील मुकार शहा याच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. Jalna Crime : चोर समजून चौघांची तरुणाला बेदम मारहाण, मृत्यूपूर्वीची दयेची विनवणी ठरली व्यर्थ
  2. Crime News : प्रेयसीच्या प्रेमात कर्जबाजारी झाला अन्...
  3. Palghar Crime : पालघर साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली; पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे दोन्ही साधू सुखरूप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.