ETV Bharat / state

भंडाऱ्यात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 5, 2019, 10:35 PM IST

साहिल विजय बांते (२१ वर्ष), राहुल मनोहर रामटेके (३६) वर्ष आणि सविता छगन घाटोळकर (५४ वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

अपघात

भंडारा - जिल्ह्यात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह २ तरुण ठार झाले आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे २ भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत २ युवकांचा मृत्यू झाला. तर लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळ पतीच्या दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. साहिल विजय बांते (२१ वर्ष), राहुल मनोहर रामटेके (३६) वर्ष आणि सविता छगन घाटोळकर (५४ वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

दवडीपार गावाजवळ झालेल्या अपघातात गाडीवर असलेल्या दोघांच्याही डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत साहिल बांते हा भंडारा येथील साईनाथ नगरचा रहिवासी होता. तो ब्रह्मपुरी येथील बापुराव देशमुख तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने तो गावी आला होता. मंगळवारी दुपारी घरून ब्रह्मपुरीला जात असताना त्याचा अपघात झाला. राहुल हा पवनी तालुक्यातील मोखारा गावातला रहिवासी होता. राहुल रामटेकेच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ मोठी गर्दी केली होती.

तर दुसर्‍या घटनेत लाखणी तालुक्याच्या लाखांदूर येथे सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला. सविता घाटोळकर या गोंदिया जिल्ह्यातील बाराभाटी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. त्या पती छगनच्या दुचाकीवरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना खड्ड्यातून दुचाकी उसळल्याने सविता खाली कोसळल्या, त्यात त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Intro:accident photo send on whatsappv

ANC : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोन तरुण ठार झाले आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे दोन बाईक समोरासमोर आढळून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळ पतीची दुचाकी खड्ड्यातून उचलल्याने मागे बसलेली आरोग्य सेविका खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. साहिल विजय बांते 21 वर्ष, राहुल मनोहर रामटेके 36 वर्ष आणि सविता छगन घाटोळकर 54 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.


Body:मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भंडारा तालुक्यातील दवडीपार गावाजवळ दोन मोटारसायकली एकमेकावर कडून भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचेही डोक्याला जबर दुखापत झाली तर दोघांची पाय मरून पडलेले होते या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतक साहिल बांते हा भंडारा येथील साईनाथ नगरचा रहिवासी होता तो ब्रह्मपुरी येथील बापुराव देशमुख तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता दोन दिवस सलग सुट्ट्या असल्याने तू गावी आला होता मंगळवारी दुपारी घरून निघालो ब्रह्मपुरी ला जात असताना दवडीपार जवळ समोरून येणाऱ्या राहुल मनोहर रामटेके याच्या दुचाकीला जोरदार धकड झाली, राहुल हा मोखारा, तालुका पवनी येथे राहत असून तो काही काम निमित्य पवनी वरून भंडारा च्या दिशेने येत होता. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला, राहुल रामटेके याला पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ मोठी गर्दी केली याची माहिती कारधा पोलीस स्टेशनला मिळतात पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचत दोन्ही मृतदेह संशोधनासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले. दोन्ही बाईकस्वार ठार झाल्याने अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांचा आक्रोश मन हलविणारा होता.

तर दुसर्‍या घटनेत लाखणी तालुक्याच्या लाखांदूर येथे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. सविता घाटोळकर या गोंदिया जिल्ह्यातील बाराभाटी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या त्या पती छगन च्या दुचाकीवरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात होत्या दुचाकी क्रमांक एम एच 36 P 7261 त्या पतीसोबत जात असताना पालांदूर पासून एक किमी अंतरावर जी गोरी मार्गावर खड्ड्यात दुचाकी उसळली त्यामुळे मागे बसून असलेल्या सविता खाली कोसळल्या त्यात त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्यांना पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मत्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला एका खड्ड्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे याप्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.