ETV Bharat / state

बीडमध्ये जुन्या वादातून शिक्षकाचा खून; आरोपी फरार

author img

By

Published : Sep 19, 2019, 8:25 PM IST

सय्यद साजिद अली, असे खून झालेल्या 35 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. बीड शहरातील बालेपीर येथील रहिवासी असलेले सय्यद साजिद अली सैनिकी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

बीडमध्ये जुन्या वादातून शिक्षकाचा खून

बीड - शहरातील बालेपीर भागात बीड-नगर मार्गावर एका 35 वर्षीय सहशिक्षकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली. खून झालेल्या शिक्षकाने 2 महिन्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यामध्ये तिघांनी खून केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

बीडमध्ये जुन्या वादातून शिक्षकाचा खून

हेही वाचा - दत्तक घेतलेल्या 'धसवाडी' गावात 5 वर्षात एकदाही गेल्या नाहीत मंत्री पंकजा मुंडे... पाहा परिस्थिती

सय्यद साजिद अली, असे खून झालेल्या 35 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. बीड शहरातील बालेपीर येथील रहिवासी सय्यद साजिद अली हा एका सैनिकी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी नमाज पडून हॉटेलमध्ये चहा घेत असताना त्याचा खून करण्यात आला. जुन्या वादातून कुकरीने वार करत आरोपींनी सय्यद अलीची हत्या केली.

जोपर्यंत मारेकरी पकडणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; मृताच्या नातेवाइकांनी घेतली भूमिका -

दरम्यान, जोपर्यंत पोलीस मारेकऱ्यांना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका खून झालेल्या सय्यद साजिद अली याचा मोठा भाऊ सय्यद जावेद अली यांनी घेतली आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात मृताच्या नातेवाइकांनी गर्दी केली आहे. मृताच्या नातेवाईकांना घेतलेल्या भूमिकेमुळे बीड जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून खुन्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात

Intro:बीडमध्ये जुन्या वादातून दिवसाढवळ्या सहशिक्षकाचा खून; अज्ञात आरोपी फरार

बीड- शहरातील बालेपीर भागात बीड -नगर मार्गावर एका 35 वर्षीय सहशिक्षकाचा दिवसाढवळया खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली आहे. खून झालेला सहशिक्षकाने दोन यापूर्वी संबंधित पोलिस ठाण्याला पोलिसांकडे तक्रार देऊन माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले असल्याचे देखील समोर येत आहे. खून केलेल्या आरोपींचा शोध बीड पोलीस घेत आहेत. यामध्ये तिघांनी खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Body:सय्यद साजिद अली असे खून झालेल्या 35 वर्षीय सह शिक्षकाचे नाव आहे. बीड शहरातील बालेपीर येथील रहिवासी येथे रहिवासी सय्यद साजिद अली हा एका सैनिकी विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी येथील नमाज मध्ये नमाज पडून मज्जित चा पुढील हॉटेलमध्येच चहा घेत असताना त्याचा दिवसाढवळ्या निर्घुणपणे खून करण्यात आला. जुन्या वादातून जुन्या वादाची कुरापत काढून बीड शहरातील नगर रोड मार्गावर एका छोटा चहाचा हॉटेलवर सय्यद आली बसला असता मारेकर्‍यांनी येऊन दिवसाढवळ्या कुकरी ने वार करत सय्यद साजिद अली याला संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बीड जिल्हा रुग्णालयात सय्यद साजिद अली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. रुग्णालय परिसरात बालेपीर भागातील नागरिकांनी गर्दी केली आहे घटनास्थळाला पोलीस उप अधीक्षक विजय काबाडे यांनी भेट दिली आहे.


Conclusion:मारेकरी फरार झाले असून, बीड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. खून करण्यामागचे नेमके कारण उद्यापर्यंत स्पष्ट नाही. मात्र जुन्या वादातून हा खून केला असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात बालेपीर येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती परवाचे वातावरण निर्माण झाले होते मोठ्याप्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जिल्हा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.