ETV Bharat / state

राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात

author img

By

Published : Sep 18, 2019, 3:13 PM IST

Updated : Sep 18, 2019, 3:31 PM IST

परळीसाठी धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी

बीड - विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. त्याआधीच राष्ट्रवादीने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धनंजय मुंडे यांना परळीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

परळीसाठी धनंजय मुंडे, गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली असून गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहिण-भावाचा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.