ETV Bharat / state

अमरावतीतही 'हिट अँड रन', भरधाव कारनं एकाला चिरडलं; 22 दिवसानंतरही गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अपयश - Amravati Accident News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 3:17 PM IST

Updated : May 25, 2024, 8:15 PM IST

Amravati Accident News : अमरावतीमध्ये 3 मे रोजी हिट अँड रनची घटना घडली होती. अद्यापही या कार चालकाचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. आरोपीचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबांकडून केली जात आहे.

Amravati Accident News
Amravati Accident News (reporter)

अमरावती Amravati Accident News : पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशात गाजत असतानाच अमरावती शहरात गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ मे रोजी कठोरा नाका परिसरातील संमती कॉलनी परिसरात एका भरधाव वेगात कार चालकानं एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला असून या प्रकरणात गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 3 मे रोजी ही घटना घडली तरी अद्याप पाेलिसांना कार चालकाचा शाेध लागलेला नाही.

कारनं दुचाकीला दिली धडक : अमरावती शहरातील किशोर नगर परिसरातील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा परिसरातील संमती कॉलनी येथून आपल्या दुचाकीनं जात असताना भरधाव वेगान जात असलेल्या इंडिका कारनं त्यांना उडवलं. अपघातानंतर दुचाकीस्वाराला रस्त्यावरच साेडून कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेत असणारे भीमसेन वाहने यांना तेथील नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी : या प्रकरणात भीमसेन वाहने यांचा मुलगा रोशन वाहने यानं गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील दिलं मात्र पोलिसांना अद्याप देखील संबंधित कार आणि कारचालकांचा पत्ता लागलेला नाहीय. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी वाहने यांच्या कुटुंबांकडून केली जात आहे.

हेही वाचा

डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने जणू 'मृत्युचे कारखाने', २०११ पासून ५५ दुर्घटनांमध्ये ५० पेक्षा जास्त बळी - dombiwali MIDC blast

पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case

पुण्यापाठोपाठ नागपुरातही मद्यधुंद चालकाचा 'कारनामा', भरधाव कारनं धडक दिल्यानं लहान मुलासह तिघे जखमी - nagpur accident

Last Updated : May 25, 2024, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.