ETV Bharat / bharat

गनपावडर निर्मितीच्या कारखान्यात स्फोट, घरांना बसले हादरले! - Chhattisgarh Blast

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 12:18 PM IST

Updated : May 25, 2024, 2:32 PM IST

Bemetra Blast छत्तीसगडमधील बेमेत्रा जिल्ह्यात गनपावडर कारखान्यात भयंकर स्फोट झाला. या स्फोटात १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट झाल्यानंतर घटनेची तीव्रता पाहण्याकरिता कारखान्याबाहेर हजारो लोकांनी गर्दी केली.

Chhattisgarh Blast
Chhattisgarh Blast (Source- ETV Bharat)

गनपावडर कारखान्यात भयंकर स्फोट (Source- ETV Bharat Reproter)

रांची- बेमेटारा येथील बेरला ब्लॉकमधील गनपावडर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली आहे. शेजारील गावातील लोक कारखान्याबाहेर पोहोचले आहेत. या स्फोटात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्यातरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. स्फोट झाल्याचं समजतात बेमेटराचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा, शेतकरी नेते योगेश तिवारी, जिल्हा पंचायत सदस्य राहुल टिकरीहा घटनास्थळी पोहोचले.

लोकांची गर्दी (Source- ETV Bharat)

बर्ला ब्लॉकच्या बोरसी गावात असलेल्या गनपावड कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला. स्फोटानंतर गावातील अनेक लोकांच्या घरांना हादरे बसले. भीतीनं गावातील लोक घराबाहेर पडले आहेत. आजूबाजूला धुराचे लोट पसरल्याने सगळीकडं धुराचं साम्राज्य दिसत आहे. स्फोटानंतर कारखान्याबाहेर जमा झालेल्या लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. संतप्त लोकांनी कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्फोटानंतरही गॅस गळती- रायपूर ट्रॅफिक डीएसपी गुरजीत सिंह हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, बेमेत्राहून रायपूरला आणल्या जाणाऱ्या जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रस्त्यावरील वाहतूक खुली करण्यात येणार आहे. 6 जखमींना रायपूरला पाठवण्यात आले आहे. एकाचा वाटेतच मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, "संपूर्ण प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तपासानंतर मृतांची ओळख पटू शकणार आहे." घटनास्थळीअग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. स्फोटाची कारण अद्याप समजू शकलेले नाही. रायपूर येथून एसडीआरएफचे 20 सदस्यांचे बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. स्फोटानंतरही गॅस गळती होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : May 25, 2024, 2:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.