ETV Bharat / state

'हिट अँड रन' कायदा विरोधात अमरावतीत 'स्टेअरिंग बंद आंदोलन', वाहन चालकांचं उपोषण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 8:02 PM IST

Steering Band Andolan
ट्रक चालकांचे आंदोलन

Steering Band Andolan: 'हिट अँड रन' कायद्या विरोधात (Hit and Run Act) देशभरातील ट्रक चालकांमध्ये रोष व्यक्त होत असताना अमरावतीत बुधवारी ट्रक चालकांसह स्कूलबस आणि चार चाकी टॅक्सी चालकांनी 'स्टेअरिंग बंद आंदोलन' छेडलं आहे. या आंदोलनामुळे विविध भागात ट्रक चालकांनी निदर्शनं केली असून काही भागात तणाव देखील निर्माण झाला. (Truck drivers agitation)

ट्रकचालकांच्या संपावर इमरान खान यांचे मत

अमरावती Steering Band Andolan : 'हिट अँड रन' कायद्याविरोधात आठ दिवसांपूर्वी छेडण्यात आलेलं आंदोलन दोन दिवसात मागे घेण्यात आलं होतं. बुधवारी मात्र पुन्हा एकदा या कायद्याविरोधात ट्रक चालकांसह अनेक खासगी वाहन चालक देखील आंदोलनात उतरले आहेत. (agitation in Amravati) बुधवारी सकाळी अमरावती नागपूर महामार्गावर आंदोलनकर्त्या चालकांनी काही वाहने अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान ट्रक चालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. शहरात ज्या ठिकाणी वाहन चालकांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.


इर्विन चौकात वाहन चालकांचे उपोषण : 'हिट अँड रन' कायद्या विरोधात वाहन चालक कृती समितीच्या वतीनं बुधवारपासून चालकांनी उपोषण सुरू केलं आहे. वाहन चालक कृती समितीच्या वतीनं कुठल्याही प्रकारे आक्रमक भूमिका न घेता शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीतच 'हिट अँड रन' कायदा विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

ट्रान्सपोर्ट नगर परिसरात उभे आहेत शेकडो ट्रक : अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात स्टेअरिंग बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो ट्रक एकाच ठिकाणी उभे आहेत. सरकारने 'हिट अँड रन' या कायद्यामध्ये अतिशय कठोर शिक्षेबाबत निर्णय घेण्याची जी काही तयारी केली आहे ती अनेक ट्रक चालकांच्या कुटुंबांना उध्वस्त करणारी असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आंदोलनकर्त्या ट्रक चालकांच्या वतीनं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची पोलिसांच्या वतीनं खबरदारी घेतली जात आहे.

काय आहे कायदा? केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याविरुद्ध टॅंकर व ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.

नवीन कायद्यात काय आहे तरतूद: केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे.

विविध राज्यातील ट्रकचालक संपात सहभागी: केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रकचालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या कायद्याला देशभरातील ट्रकचालकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचे पडसाद हरियाणा, पंजाब सारख्या राज्यात अधिक प्रमाणात उमटताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे विविध राज्यातील ट्रकचालक आपले ट्रक रस्त्यावर उभे करून निघून जात होते. त्याचबरोबर सरकारने या कायद्यात तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे. अन्यथा त्याचा परिणाम देशभर दिसून येईल असा इशारा देखील ट्रकचालक संघटनांकडून देण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. अखेर आमदार अपात्रतेचा महानिकाल लागला! शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र; खरी शिवसेनाही एकनाथ शिंदेंकडेच
  2. संविधानाप्रमाणे निर्णय झाल्यास 40 आमदार अपात्र होतील - आदित्य ठाकरे
  3. आमदार अपात्रतेचा निकाल कसा असेल? खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'ही' दिली माहिती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.