ETV Bharat / state

संविधानाप्रमाणे निर्णय झाल्यास 40 आमदार अपात्र होतील - आदित्य ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 4:12 PM IST

Aditya Thackeray  Reaction
आदित्य ठाकरे

Aditya Thackeray On MLA Disqualification Result : आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीवर कडाडून टीका केली.

प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे

कोल्हापूर Aditya Thackeray On MLA Disqualification Result : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर न्यायमूर्तींच्या (Rahul Narvekar) भूमिकेत आहेत. मात्र निकाला आधी तीन दिवस त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. न्यायमूर्ती गुन्हेगाराला भेटायला जात आहेत. संविधानिक निकाल आला तर 40 आमदार अपात्र होतील अशी प्रतिक्रिया, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केली.

सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू : एकीकडे राज्याचं लक्ष आमदार अपात्रता सुनावणीकडं लागलं आहे. मात्र, राज्यातील अनेक कामे उद्घाटनासाठी प्रलंबित आहेत. जो सत्तेसोबत नाहीत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. राज्यातील एका वृत्तवाहिनीला प्रक्षेपण बंद करायला लावणं ही मुस्कटदाबी असल्याची टीका, आदित्य ठाकरे यांनी केली.



कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक : युवा सेना प्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची लोकसभेबाबत बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पर्याय ठरू शकेल असा उमेदवार निवडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

कोल्हापुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा : भारतीय जनता पक्षाला देश पातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी पर्याय उभा करेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 14 जानेवारीला कोल्हापुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचे नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. आता महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील यांनीही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे.



हेही वाचा -

  1. कायद्याच्या चौकटीत 16 आमदार अपात्रच; कायदेतज्ञ उल्हास बापट
  2. निर्णय दिल्लीतून झालेला, इथं फक्त शिक्का मारतील- संजय राऊत
  3. काही तासांत येणार शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल; निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.