ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 AUS vs AFG : अदभूत, अविश्वसनीय! 'संकटमोचक' मॅक्सवेलनं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 7:37 AM IST

Updated : Nov 8, 2023, 8:19 AM IST

Cricket World Cup 2023 AUS vs AFG : ग्लेन मॅक्सवेलनं वानखेडे स्टेडियम चांगलेच गाजवलं. 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 7 बाद 91 अशा दयनीय अवस्थेत होती. तिथून सामना जिंकणं म्हणजे चमत्कारच. परंतु, कांगारुसाठी संकटमोचक ठरलेल्या मॅक्सवेलनं हा चमत्कार केला. त्यानं कर्णधार पॅट कमिन्सला सोबतीला घेऊन एकहाती अफगाणिस्तानचा पराभव केला. या ऐतिहासिक खेळीत त्यानं अनेक विक्रम केले.

Cricket World Cup 2023 AUS vs AFG
Cricket World Cup 2023 AUS vs AFG

मुंबई Cricket World Cup 2023 AUS vs AFG : ग्लेन मॅक्सवेलला चालताही येत नव्हते, अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या द्विशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करता अफागणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेल्या 292 धावांचं पाठलाग करतांना कांगारुंनी अवघ्या 91 धावांत सात विकेट्स गमावल्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं ऐतिहासिक द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यावर ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी लढत अफगाणिस्ताच्या तोंडातील विजय खेचून आणला. या खेळीत त्यानं अनेक विक्रम केले आहेत.

धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम खेळी : एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना मॅक्सवेलची द्विशतकी खेळी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. मॅक्सवेलनं 128 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांच्या मदतीनं नाबाद 201 धावा केल्या. यापुर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर होता. त्यानं 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 193 धावा केल्या होत्या. तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना द्विशतकी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल हा इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरलाय.

  • एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे वेगवान द्विशतक : ग्लेन मॅक्सवेलची 201 धावांची खेळी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे वेगवान द्विशतक ठरलंय. पहिल्या क्रमांकावर भारताचा ईशान किशन आहे. त्यानं बांगलादेश विरुद्ध 126 चेंडूत द्विशतक केलं होतं. तसंच विश्वचषकाच्या इतिहासातील हे वेगवान द्विशतक ठरलंय.
  • विश्वचषकात द्विशतक करणारा तिसरा खेळाडू : विश्वचषक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा ग्लेन मॅक्सवेल तिसरा फलंदाज ठरलाय. यापूर्वी न्युझीलंडच्या मार्टीन गुप्तीलनं 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 237 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्येच वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावा केल्या होत्या.
  • सहाव्या क्रमांकाच्या खाली सर्वोत्तम खेळी : विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सहाव्या किंवा त्याने तळाच्या क्रमांकावर सर्वोत्तम खेळीचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलनं (201*) आपल्या नावावर केला. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडच्या केव्हिन ओ ब्रायननं इंग्लंडविरुद्ध 113 धावा केल्या होत्या. हा सामना आयर्लंडनं जिंकला होता.

आठव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी : ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीनं 8 किंवा तळाच्या क्रमांकासाठी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची मंगळवारी नोंद केली. यापुर्वी 1983च्या विश्वचषकात भारताच्या कपिल देव आणि सय्यद किरमानी यांनी नाबाद 126 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम मोडला गेला. ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीनं 8 व्या विकेटसाठी 202 अभेद्य भागीदारी केलीय. विशेष म्हणजे यात पॅट कमिन्सचं योगदान केवळ 12 धावांचं होतं.

  • वनडेत द्विशतक करणारा पहिला नॉन-ओपनर फलंदाज : आजपर्यंत पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 एकदिवसीय द्विशतकं झाली. परंतु, ग्लेन मॅक्सवेलची वानखेडेवर शानदार खेळी होईपर्यंत केवळ सलामीवीरानेच द्विशतक ठोकले होते. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनं नॉन-ओपनरद्वारे पहिलं द्विशतक केलं.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम वयक्तिक खेळी : ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलची 201 धावांची खेळी सर्वोत्तम वयक्तिक खेळी ठरलीय. तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरलाय. यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसननं 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नाबाद 185 धावा केल्या होत्या. मॅक्सवेलनं हा विक्रमही काल मोडला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : मॅक्सवेलच्या अंगात आलं! अफगाणिस्तानला एकहाती धोबीपछाड दिला
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या रचिन रवींद्रला आवडतात दक्षिण भारतीय पदार्थ, आजोबांनी शेअर केले किस्से
  3. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय
Last Updated :Nov 8, 2023, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.