ETV Bharat / sports

केकेआरच्या विजयानंतर गौतमची 'गंभीर' पोस्ट; मध्यरात्री केलेली 'ही' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय - Gautam Gambhir Post

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 10:16 AM IST

IPL 2024 Final : यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आयपीएलचा चॅम्पियन बनला. केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरचं खूप कौतुक होतंय. अंतिम सामन्यानंतर गौतम गंभीरनं सोशल मीडियावर एक श्लोक पोस्ट केली. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

केकेआरच्या विजयानंतर गौतमची 'गंभीर' पोस्ट
केकेआरच्या विजयानंतर गौतमची 'गंभीर' पोस्ट (Desk)

चेन्नई IPL 2024 Final : यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आयपीएलचा चॅम्पियन ठराला. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून दारुण पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघाचा मेंटॉंर गौतम गंभीरनं केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरचं खूप कौतुक होतंय. त्यातच अंतिम सामन्यानंतर गौतम गंभीरनं सोशल मीडियावर एक श्लोक पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं.

गौतम गंभीरची पोस्ट काय : गौतम गंभीरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात "ज्याचे विचार आणि आचरण सत्याचे आहेत, त्याचा रथ आजही श्रीकृष्ण चालवतात", असं गंभीरनं लिहिलंय. विशेष म्हणजे ही पोस्ट गंभीरनं मध्यरात्री 2.33 वाजता शेअर केली. त्याच्या या पोस्टवर जगभरातून चाहते कमेंटद्वारे कौतुक करत असून त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरतंय.

गंभीर केकेआरमध्ये परतल्यानंतर संघ विजयी : गंभीर केकेआरमध्ये आल्यानंतर फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही बदल झालेला दिसत होता. गंभीरनं अष्टपैलू सुनील नरेनला सलामीला पाठवलं. याचा संघाला खूप फायदा झाला. त्यानं 15 सामन्यांत 488 धावा केल्या. यात त्यानं 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली. गंभीरनं आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्यावर दडपण येऊ दिलं नाही. त्याचा संपूर्ण संघाला आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फायदे झाले.

गौतम गंभीर अन् चंदू पंडितचं डोकं : मैदानावर श्रेयस अय्यरच्या संघानं शानदार खेळी करत चषकावर नाव कोरलं. पण या विजयामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कोच चंदू पंडित यांचाही मोलाचा वाटा आहे. या जोडगोळीनं अचूक प्लॅननं हैदराबादला चारी मुंड्या चित केलं. मैदानाबाहेरुन या दोघांनी युक्त्या लढवत खेळाडूंना मार्गदर्शन केलं. हैदराबादच्या प्रत्येक खेळाडूविरोधात या दोघांनी प्लॅन आखला होता. त्या प्लॅनवर श्रेयस अय्यरच्या संघानं काम करून विजेतेपद पटकावलं.

हेही वाचा :

  1. 'कोरबो, लोरबो, जीतबो'; अंतिम सामन्यात कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा कोरलं चषकावर नाव - KKR vs SRH
  2. कोलकाता-हैदराबाद आज आयपीएलच्या विजेतेपदासाठी भिडणार, दोन्ही संघांच्या 'या' खेळाडूंवर असणार सर्वांची नजर - IPL 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.