ETV Bharat / sports

Afghanistan Cricket अफगाणिस्तानच्या खेळाडूंना जगभरात T20 लीग खेळण्याचा फायदा झाला, राशिद खानचे वक्तव्य

author img

By

Published : Aug 30, 2022, 6:51 PM IST

Rashid Khan
राशिद खान

फिरकीपटू राशिद खानने Spinner Rashid Khan सांगितले की, जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळल्यामुळे अफगाणिस्तानच्या बहुतांश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटची कमतरता जाणवली नाही. आशिया 2022 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर त्यांचा आज दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.

दुबई: अफगाणिस्तानात तालिबान राजवट Taliban rule in Afghanistan परत येऊन एक वर्ष उलटले आहे. तालिबान राजवटीचा अफगाणिस्तान क्रिकेटवर खोलवर परिणाम झाला आहे. तालिबान राजवट परत आल्यानंतर, दोन डझनहून अधिक खेळाडूंनी संयुक्त अरब अमिराती United Arab Emirates मध्ये त्यांचे प्रशिक्षण तळ बनवले आहे. विशेष म्हणजे तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेटशी Afghanistan Cricket संबंधित अनेक प्रायोजकांनी हात आखडता घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC पूर्ण सदस्य म्हणून अफगाणिस्तानच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कारण तालिबान महिला क्रिकेटच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून आले होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेट पूर्णपणे थांबले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर आणि फिरकीपटू रशीद खानने सांगितले की, जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळल्यामुळे अफगाणिस्तानच्या बहुतांश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटची कमतरता जाणवली नाही No dearth of international cricket.

जगभरात खेळल्या गेलेल्या T20 लीगचा फायदा झाला: राशिद खान

स्टार फिरकीपटू रशीद खान म्हणाला की, जगभरातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळल्यामुळे अफगाणिस्तानच्या बहुतांश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कमतरतेचा सामना करण्यास मदत झाली T20 leagues played around world benefited आहे. फ्युचर टूर्स प्रोग्राम Future Tours Program कॅलेंडरमध्ये अफगाणिस्तान संघ फक्त काही आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. अशा वेळी जगभरात खेळल्या जाणाऱ्या साखळी सामन्यांचा मोठा फायदा राशिद आणि मोहम्मद नबी या खेळाडूंना मिळणार आहे.

आम्हाला आणखी आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत: राशिद खान

"आम्ही फार लांब फॉरमॅट क्रिकेट (एकदिवसीय आणि कसोटी सामने) खेळत नाही," राशीदने मंगळवारी शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्धच्या आशिया कप सामन्यापूर्वी पत्रकारांना सांगितले Rashid Khans press conference. तथापि, तो पुढे म्हणाला, 'आमची इच्छा आहे की अफगाणिस्तानने अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळावेत जेणेकरुन युवा खेळाडूंनी त्यांचे कौशल्य सुधारता यावे.'

राशिद पुढे म्हणाला Rashid Khan Statement , 'आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय लीग खेळतो. त्यामुळे आम्हाला सर्वोत्तम खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळते. 'आम्ही तो अनुभव आंतरराष्ट्रीय संघात आणतो. आम्ही बाकीच्या खेळाडूंसोबत लीगचा अनुभव शेअर करतो. आशिया 2022 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता. रशीद म्हणाला की, ट्वेंटी-20 लीग खेळूनही आपल्या देशातील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देतील.

हेही वाचा - Sarfaraz Ahmed on Ind vs Pak पाकिस्तानच्या पराभवावरुन गदारोळ, महिला पत्रकारावर भडकला सरफराज अहमद, जाणून घ्या प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.