ETV Bharat / sitara

फादर्स डे : बॉलिवूड कलाकारांनी वडिलांसाठी शेअर केल्या खास पोस्ट

author img

By

Published : Jun 21, 2020, 3:56 PM IST

fathers day post bollywood
बॉलिवूड कलाकारांनी वडिलांसाठी शेअर केल्या खास पोस्ट

दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही वडील हरिवंश राय बच्चन यांचे फोटो शेअर केले. फोटोसोबत त्यांनी लिहिले, हमे पढाओ ना..रिश्तो की कोई और किताब..पढे हैं बाप के चेहरे की झुरीया हम..! अभिनेत्री सोनम कपूर आहूजाने इन्स्टाग्रामवर वडील अनिल कपूरसाठी पोस्ट लिहिली आहे.

मुंबई - 21 जून हा दिवस जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जात आहे. याच निमित्ताने कलाकारांनीही आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. यात अमिताभ बच्चन, सोहा अली खान, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

fathers day post bollywood
कलाकारांनी वडिलांसाठी शेअर केल्या खास पोस्ट

सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एक पोस्ट तिने तिचे वडील मन्सूर अली खान आणि दुसरी तिचा पती आणि नुकताच बाबा झालेला कुणाल खेमू याच्यासाठी शेअर केली आहे. सोहाने आपल्या चिमुकल्यांसह कुणालचे फोटो पोस्ट केले. याशिवाय वडिलांसोबतचे काही जुने फोटो शेअर करत तिनं लिहिलं, मी दररोज तुमचा विचार करते.

दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही वडील हरिवंश राय बच्चन यांचे फोटो शेअर केले. फोटोसोबत त्यांनी लिहिले, हमे पढाओ ना..रिश्तो की कोई और किताब..पढे हैं बाप के चेहरे की झुरीया हम.!!. रिधीमा कपूरनेही ऋषी आणि नीतू कपूर यांचा फोटो शेअर केला आहे. हॅपी फादर्स डे पापा, असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आहूजाने इन्स्टाग्रामवर वडील अनिल कपूरसाठी पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलं, अशा वडिलांच्या घरी जन्म घेतला ही माझी धन्यता मानते. ज्यांनी मला प्रामाणिकपणाचे मूल्य, नैतिकता, प्रगतीशील विचारांचे आणि कामाच्या नैतिकतेचे महत्त्व शिकविले. माझ्या आयुष्यातील सुपरहिरोला फादर्स डेच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.