ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर दिसतोय संजू बाबा; पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 12:07 PM IST

Updated : Nov 24, 2023, 2:16 PM IST

Ranbir Kapoor looks like Sanjay Dutt : 'अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूरचा लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्रेलरमधील रणबीरचा लूक सोशल मीडियावर लोकप्रिय झाला, जो पाहून चाहत्यांना संजय दत्तची आठवण झाली. पाहा सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया.

Ranbir Kapoor looks like Sanjay Dutt
रणबीर कपूर दिसतोय संजू बाबा

मुंबई : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी 23 नोव्हेंबर रोजी रिलीज केला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तो लोकप्रिय झाला. ट्रेलरनं सोशल मीडियावर चाहत्यांची मनं जिंकली. ट्रेलरमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलेला सीन म्हणजे रणबीर सिंगचा लूक. या चित्रपटातील रणबीरचा लूक बॉलिवूडच्या संजू बाबा उर्फ ​​संजय दत्तसारखा आहे. आता नेटिझन्सनी संजय दत्तला 'X' वर ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅनिमलचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, हॅशटॅग संजय दत्त 'X' वर ट्रेंड करू लागला. काही नेटिझन्सनी रणबीरचा लूक 2018 च्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू चित्रपटासारखाच असल्याचं वर्णन केलं, तर काहींनी त्याची तुलना तरुण संजय दत्तशी केली.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया : 'अ‍ॅनिमल'मधील रणबीर कपूरचा लूक शेअर करताना एका एक्स युजरनं लिहिलं, 'मला अजूनही रणबीर कपूरमध्ये संजय दत्त दिसतो ?' तर एकानं लिहिलं आहे की, या चित्रपटात रणबीर कपूर संजयसारखा दिसत आहे. संजय दत्तच्या यंग लूकवर चर्चा करताना एका यूजरनं लिहिलं आहे की, 'जेव्हा मी पहिल्यांदा रणबीरला इथं पाहिलं तेव्हा तो संजय दत्तसारखा दिसत होता.

अ‍ॅनिमल 'या' दिवशी होणार प्रदर्शित : 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरला उत्कृष्ट रेटिंग दिली जातेय. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. त्यांनी यापूर्वी शाहिद कपूरसोबत कबीर सिंग हा चित्रपट बनवला होता. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी 1.30 दिल्लीतून प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सौरभ सचदेवा, सुरेश ओबेरॉय, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर
  2. 'अ‍ॅनिमल'मधील भूमिकेचं अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंगशी साम्य असल्याचं रणबीर कपूरनं केलं कबुल
  3. पौढ प्रेक्षकच पाहू शकणार 'अ‍ॅनिमल', अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Last Updated : Nov 24, 2023, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.