'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर

'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर
Animal trailer release date out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर हा लवकरच रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज तारीख जाणून घेण्यासाठी वाचा
मुंबई - Animal trailer release date out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'अॅनिमल'च्या ट्रेलरची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतेच 'अॅनिमल' या चित्रपटातील पहिलं गाणं 'हुआ मैं ' रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं चाहत्यांना खूप पसंत पडलं होतं. रणबीर कपूरच्या भन्नाट अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. दरम्यान 'अॅनिमल' चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली गेली आहे. आता रणबीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आहे. आता ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांना जास्त वेळ थांबण्याची गरज नाही.
अॅनिमलचा ट्रेलर कधी रिलीज होणार? : 'अॅनिमल' दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी रणबीर कपूरसोबत मोनोक्रोम फोटो शेअर करून चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाचा ट्रेलर 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यासाठी दोन दिवस उरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' पेक्षा जास्त रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाच्या चित्रपटाला अमेरिकेत स्क्रीन्स मिळाल्या आहेत. 'अॅनिमल' चित्रपटाला एकूण 888 मिळाल्या आहे. 'जवान' अमेरिकेत 850 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र 810 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळं परदेशात 'अॅनिमल' चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
'अॅनिमल' कधी रिलीज होणार ? : 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपटही याच दिवशी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर विकी आणि रणबीरची ही मोठी टक्कर महत्त्वाची मानली जात आहे. रणबीरला त्याच्या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी रणबीर शेवटी 'तू झुठी मै मक्कार' या चित्रपटामध्ये श्रध्दा कपूरसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता. दुसरीकडे विकी कौशल शेवटी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामध्ये सारा अली खानसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
हेही वाचा :
