ETV Bharat / entertainment

पौढ प्रेक्षकच पाहू शकणार 'अ‍ॅनिमल', अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 2:49 PM IST

Animal Movie Trailer: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडत आहे. याशिवाय चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र दिलं गेलंय.

Animal Movie Trailer
Animal Movie Trailer

मुंबई - Animal Movie Trailer: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अनेकजण उत्सुक आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाद्वारे पहिल्यादांच रणबीर आणि रश्मिका रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान आज 23 नोव्हेंबर रोजी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडलाय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालंय. त्यामुळे हा चित्रपट प्रौढ श्रेणीतील आहे. अ‍ॅनिमल चित्रपटाचा रनटाइम 3 तास 2 मिनिटांचा असेल. चित्रपटाचा 3 मिनिटे 32 सेकंदचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अ‍ॅनिमल होणार 'या' दिवशी प्रदर्शित : 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरला उत्कृष्ट रेटिंग दिली जातेय. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. त्यांनी यापूर्वी शाहिद कपूरसोबत कबीर सिंग हा चित्रपट बनवला होता. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी 1.30 दिल्लीतून प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सौरभ सचदेवा, सुरेश ओबेरॉय, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर : 'अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीरचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्याचं त्याच्या वडिलांवर म्हणजेच अनिल कपूरवर प्रचंड प्रेम असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. अनिल कपूर हा प्रसिद्ध उद्योगपती असतो आणि रणबीर हा या चित्रपटात गँगस्टर दाखवण्यात आलाय. अनिल कपूरवर कोणी तरी गोळी चालतो. त्याचा शोध रणबीर घेत असतो. ट्रेलरमध्ये रणबीर अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. ट्रेलरच्या शेवटी रणबीर आणि बॉबी यांच्यामध्ये फायटिंग सीन अंगावर शाहरे आणतो. या चित्रपटामध्ये बॉबी खलनायकाची भूमिका सकारतोय.

हेही वाच :

  1. अगस्त्य नंदानं कथित गर्लफ्रेंड सुहानसोबत कापला वाढदिवसाचा केक, व्हिडिओ व्हायरल
  2. सलमान खानची भाची अलीझेह अग्निहोत्रीच्या डेब्यू चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग
  3. उत्तर माहित असूनही 1 कोटीचा प्रश्न चुकीचा खेळला 8 वर्षाचा विराट अय्यर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.