ETV Bharat / entertainment

उत्तर माहित असूनही 1 कोटीचा प्रश्न चुकीचा खेळला 8 वर्षाचा विराट अय्यर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 11:57 AM IST

Virat Iyer won and lost कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सिझनमध्ये 8 वर्षाचा विराट अय्यरनं 14 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन सर्वांसह बिग बींनाही चकित केलं. त्यानंतर त्याला विचारण्यात आलेल्या 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचंही त्याला उत्तर माहिती होतं. परंतु त्यानं निवडलेला पर्याय चुकीचं ठरला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

Virat Iyer won and lost
1 कोटीचा प्रश्न चुकीचा खेळला 8 वर्षाचा विराट अय्यर

मुंबई - Virat Iyer won and lost कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या पर्वाचा नवीन एपिसोड उपस्थितांसह करोडो प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला. यामध्ये विराट अय्यर हा 8 वर्षाचा स्पर्धक हॉटसीटवर विराजमान झाला होता. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 14 व्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन त्यानं 50 लाख रुपये जिंकले त्यावेळी सर्वांनी श्वास रोखले होते. त्यानंतर त्याला बिग बी यांनी 1 कोटीसाठीचा 15 वा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे अनेक तपशील त्याला माहिती होते. मात्र त्यानं निवडलेला पर्याय चुकीचा ठरला आणि त्याला 3 लाख 20 वर समाधान मानावं लागलं.

विराटला 50 लाखासाठी विचारण्यात आलेला प्रश्न असा होता. यापैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजात लाल, पांढरा किंवा निळा हे तीन सर्वात सामान्य ध्वज रंग नाहीत? A ) क्युबा B ) कोलंबिया C ) माली D ) जमैका

यासाठी विराटकडे कोणतीही लाईफ लाईन उरली नव्हती. त्यानं विचार केला आणि त्यानं D ) जमैका हा पर्याय निवडला. त्याचं हे उत्तर बरोबर निघालं आणि त्यानं 50 लाख रुपये जिंकले.

त्यानंतर त्याला 1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न होता. पिरीयॉडिक टेबलमध्ये अनुक्रमे 96 आणि 109 या अणुक्रमांकाच्या दोन घटकांच्या नावात काय वेगळेपण आहे?. यासाठी पर्याय आहेत. A. नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावावर, B. महिला शास्त्रज्ञांच्या नावावर, C. भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर, D. त्यांची नावे अज्ञात आहेत.

या प्रश्नानंतर विराट अय्यर शास्त्रज्ञांची नावं सांगतो आणि पर्यायांबद्दल खूप विचार करतो. बिग बी त्याला विचार करायला सांगतात आणि खात्री नसल्यास खेळ सोडण्याचा सल्ला देतात. दरम्यान, त्याच्या पालकांनाही या प्रश्नानंतर तणाव आलेला दिसतो. त्यानं खेळ सोडावा असंच त्यांना वाटत असावं. विराटने विचार करताना महिला शास्त्रज्ञांची नावं सांगितली. तो म्हणतो, हे नाव मेरी क्युरी आणि लिस मेटनर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. आणि नंतर A हा पर्याय निवडतो. बिग बी त्याला सांगतात हे उत्तर चुकलंय आणि याचे योग्य उत्तर B. महिला शास्त्रज्ञांच्या नावावर हे आहे. या चुकीच्या उत्तरामुळे 50 लाख जिंकलेला विराट थेट 3 लाख 20 हजारावर घसरतो. यामुळे छोटा विराट खूप नाराज होतो. मात्र अमिताभ बच्चन त्याची अरिजीत सिंगला भेटण्याची इच्छा पूर्ण करतो आणि त्याचं अरिजीत सिंगसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं करुन देतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

बिग बी अरिजित सिंगला व्हिडिओ कॉलवर बोलतात आणि त्याला सांगतात की, "विराट म्हणत होता की त्याला देव कसा दिसतो हे माहित नाही पण जर देव गात असेल तर त्याचा आवाज अरिजित सिंगसारखा असेल." विराटच्या या बोलण्यानं गायक अरिजीत सिंग भारावून जातो आणि विराटही त्याच्याशी बोलतो. एकंदरीत आठ वर्षाच्या विराट अय्यरनं केबीसीतला 1 कोटीची रक्कम गमावली पण प्रेक्षकांची करोडो मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला.

या प्रसंगी उपस्थितांनाही या प्रकाराचा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषक गमावल्यानंतर जशी अवस्था प्रेक्षकांची झाली होती तीच अवस्था हा एपिसोड पाहणाऱ्या देशभरातील करोडो प्रेक्षकांची झाली.

8 वर्षांचा स्पर्धक विराट अय्यर हा अतिशय परिपक्व असलेला, भरपूर माहिती आणि ज्ञान असलेला प्रतिभावान मुलगा आहे. याची प्रचिती अगदी तो हॉटसीटवर आला तेव्हापासून सर्वांनाच आली. अतिशय आत्मविश्वासानं त्यानं प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली. अमिताभ यांना त्यानं अनेक प्रश्न विचारुन थक्क केलं. सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यास अमिताभ यांच्या गाडीतून फिरण्याची इच्छाही त्यानं बोलून दाखवली. अमिताभलाही त्याचा हा बोलका स्वभाव, हजरजबाबीपणा आणि त्याची प्रतिभा आवडली आणि त्याची ही मागणी पूर्ण करत आपल्या घरी डिनरचंही आमंत्रण छोट्या विराटला दिलं.

हेही वाचा -

  1. ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा

2. कार्तिक आर्यनच्या एक्स गर्लफ्रेंडनं वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेअर

3. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलावर आधारित पाच मराठी चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.