ETV Bharat / entertainment

'कल हो ना हो'च्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते वडिलांची उपस्थिती, करण जोहरची भावनिक पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:04 PM IST

Kal Ho Naa Ho turns 20 : धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने बनलेल्या 'कल हो ना हो' या चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करण जोहरचे वडील यश जोहर यांचा हा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची उपस्थिती जाणवते, असं करण जोहरनं या निमित्तानं लिहिलंय.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - Kal Ho Naa Ho turns 20 : शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कल हो ना हो' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं निर्माता करण जोहरनं एक दीर्घ चिठ्ठी लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. करणने इन्स्टाग्रामवर एक विशेष कोलाज व्हिडिओ टाकला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील 'हर घडी बदल रही है' या गाण्यावर काही दृश्यांची झलक पाहायला मिळते.

करण जोहरनं पोस्टला कॅप्शन दिले, "हा चित्रपट माझ्यासाठी आणि कदाचित आम्हा सर्वांसाठी अतिशय भावनिक प्रवास होता. काळजाची धडधड वाढवणाऱ्या कथेसाठी इतके तगडे कलाकार एकत्र आले होते. संपूर्ण कलाकार आणि कॅमेऱ्याच्या मागे काम करणाऱ्या टीमचं अभिनंदन."

'कल हो ना हो' हा करणचे वडील यश जोहर यांचा धर्मा कुटुंबांचा शेवटचा चित्रपट होता. याबद्दल करणनं लिहिलंय, "धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटासाठी माझा वडील कार्यरत होते, हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची उपस्थिती मला आजही चित्रपट पाहताना जाणवते. या चित्रपटासाठी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं धन्यवाद, बाबा. मला तुमची नेहमीच आठवण येईल,"

इतका सुंदर चित्रपट तयार केल्याबद्दल करण जोहरनं दिग्दर्शक निखिल अडवाणीचेही आभार मानले आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित, 'कल हो ना हो' चित्रपट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आणि आवडतो. या चित्रपटातील शाहरुखची भूमिका आणि त्याच्या तोंडी असलेले संवाद लोक अजूनही विसरु शकलेले नाहीत. या चित्रपटातील प्रीती झिंटा आणि शाहरुखच ऑन स्क्रिन केमेस्ट्रीही लोकांच्या कायम आठवणीत राहणारी आहे.

'कल हो ना हो' या चित्रपटाचे संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी साउंडट्रॅक आणि स्कोअर देऊन चित्रपटाची गाणी श्रवणीय बनवली होती. यातील ‘इट्स द टाइम टू डिस्को’, ‘कुछ तो हुआ है’, ‘प्रिटी वुमन’ या शीर्षकगीतांना प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला. 'कल हो ना हो' 28 नोव्हेंबर 2003 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. या चित्रपटाला 2004 मध्ये दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आठ फिल्मफेअर पुरस्कार, तेरा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार, सहा प्रोड्यूसर गिल्ड फिल्म पुरस्कार, तीन स्क्रीन पुरस्कार आणि दोन झी सिने पुरस्कार मिळाले होते.

हेही वाचा -

  1. फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात केलं दाखल

2. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पतीला घर सोडण्याचा दिला इशारा

3. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या ओटीटी आवृत्तीचा रनटाइम 30 मिनिटे असेल जास्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.