ETV Bharat / entertainment

फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात केलं दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 12:12 PM IST

Updated : Nov 28, 2023, 2:13 PM IST

Rohit Bal Hospitalized: बी-टाऊनचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांना हृदयविकारामुळं रुग्णालयात दाखल केलं आहे. 2010 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

Rohit Bal Hospitalized
रोहित बाल रुग्णालयात दाखल

मुंबई - Rohit Bal Hospitalized: ग्लॅमर विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व फॅशन डिझायनर रोहित बल यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. या बातमीनं रोहित बलचे चाहते दु:खी झाले आहेत. रोहित बलची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. रोहित बल यांच्या जवळच्या मित्रानं सांगितलं की, रोहित यांना तीन दिवसांपूर्वी मॉडेल सूरज धालियानं हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्यांना हृदयाचा त्रास होता आणि ते बेशुद्ध झाले होते. त्यांना पेसमेकरने सात धक्के दिले होते. मूलचंद यांच्याकडे प्रकृती बिघडल्यावर त्यांना मेदांता येथे नेण्यात आलं.' रोहित यांना 13 वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.

रोहितला 2010 मध्ये हृदयविकाराचा झटकाही आला होता : रोहित बल यांना 2010 मध्येही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना स्वादुपिंडादेखील त्रास आहे. 62 वर्षीय रोहित हे गेल्या काही महिन्यांत अनेकदा आजारी पडले आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात जावे लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गंभीर अवस्थेत मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना जुना मित्र अर्जुन रामपालही भेटायला आला होता. उपचारानंतर रोहित बरे झाले होते. रोहित यांना दारूचे व्यसन असल्यामुळं त्यांना अनेकदा गंभीर आजारांचा सामाना करावा लागला आहे.

रोहितनं अमिताभपासून कंगनापर्यंत सेलेब्सचे कपडे डिझाइन केले आहेत : रोहित बलनं जवळपास तीन दशकं फॅशन इंडस्ट्री गाजवली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2001 आणि 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय फॅशन पुरस्कार आणि 2006 मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये त्यांना 'डिझायनर ऑफ द इयर' म्हणूनही गौरवण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2012 मध्ये, त्यांना लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्रँड फिनाले डिझायनर म्हणून त्याचे नाव घेण्यात आलं होतं. 'टाईम मॅगझिन'नं त्यांना फॅब्रिक आणि फॅन्टसीमध्ये भारताचे मास्टर म्हटलं आहे. रोहित हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांनी अमिताभ बच्चनपासून तर कंगना रणौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे कपडे डिझाइन केले आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पतीला घर सोडण्याचा दिला इशारा
  2. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या ओटीटी आवृत्तीचा रनटाइम 30 मिनिटे असेल जास्त
  3. एमी पुरस्कार घेऊन एकता कपूर परतली भारतात, पाहा व्हिडिओ
Last Updated : Nov 28, 2023, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.