ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पतीला घर सोडण्याचा दिला इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 11:13 AM IST

Bigg Boss 17 : 'बिग बॉसचा 17' सीझनमध्ये अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला घर सोडून जाण्याची धमकी दिली आहे. या जोडप्यामध्ये सध्या बिग बॉसच्या घरात मतभेद होताना दिसत आहेत.

Bigg Boss 17
बिग बॉसचा 17

मुंबई - Bigg Boss 17 : 'बिग बॉसचा 17'वा सीझनमधील सर्व स्पर्धक प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देत आहेत. मात्र, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यात कायमच भांडणं शोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी आणि अंकिताची आईही या दोघांची समजूत काढण्यासाठी शोमध्ये आल्या होत्या. दरम्यान, मागील एपिसोडमध्ये अंकितानं विकीला स्पष्टपणे धमकी दिली की, ती घर सोडून जाईल. 'बिग बॉसचा 17'मध्ये अंकिता आणि विकीमध्ये दूरावा येताना दिसत आहे. दोघांमध्ये अनेकदा मतभेद होत आहे. या जोडप्याचं भांडण होत असल्यानं सध्या अंकिताचे चाहते नाराज झाले आहेत.

अंकितानं दिला विकी जैनला सल्ला : नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन समर्थ जुरेलसोबत अभिषेक कुमारच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना दिसला. यानंतर समर्थनं अभिषेकला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर अभिषेक विकीमध्ये गैरसमज निर्माण झाले. त्यानंतर अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला या गेममध्ये पूर्णपणे अडकू नका असे समजावताना दिसली. अंकिता म्हटलं, 'जर कोणाला तुमच्याशी बोलायचं नसेल तर त्यांच्याशी बोलू नका. मी इथे तुमच्यासाठी आहे आणि ज्यांना तुमच्यासोबत बसायचे आहे ते तुमच्यासोबत बसतील. हे लोक कोण आहेत? कोणाबद्दल काही बोलणारे, त्यांना खेळाबद्दल काहीही माहिती नाही. काही हरकत नाही, अशा गोष्टी घडतात. तू समर्थशी बोलत असताना मी तुला इशाराही दिला होता. मी तुला त्याच्याशी असं बोलू नको असं सांगितलं होत. तो तुझ्या पाठीत वार करेल हे मला माहित होत आणि तेच झालं'. अंकिता पुढं म्हटलं, 'विकी, तो समर्थ जुरेल तुझ्याशी ज्या प्रकारे बोलतो ते मला आवडत नाही. ते मुले आहेत, मला हे माहित आहे तू ओव्हर स्ट्रॅटेजीमध्ये अडकला आहेस'.

अंकितानं विकी जैनला घर सोडण्याची दिली धमकी : अंकिता पुढं म्हटलं, 'ज्यानं तुझा अपमान केला ते कोणीच नाही. हा एक खेळ आहे मला समजते. हे लोक माझ्या घरी विकी येणार नाहीत आणि जर तू यांना घरी आणले तर मी घर सोडून जाईन.' अंकितानं विकीला पुढं सांगितलं, 'मी तुला हे सांगत आहे कारण मला माहित आहे की तू या गोष्टी बरोबर करशील, पण विकी हे मला खूप त्रायदायक वाट आहे. 'मुनावर ज्या पध्दतीनं खेळत आहे ते चुकीची नाही. विकी तो एक हुशार खेळाडू आहे. तुझे पत्ते आता उघड झाले आहेत, ज्यामुळे लोकांचा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही.'

हेही वाचा :

  1. एमी पुरस्कार घेऊन एकता कपूर परतली भारतात, पाहा व्हिडिओ
  2. 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1'चा फर्स्ट लुक टीझर रिलीज, ऋषभ शेट्टी दमदार अंदाजात
  3. 'अ‍ॅनिमल' प्री-रिलीज इव्हेंटसाठी रणबीर कपूरसह दिसेल 'हे' स्टार्स
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.