ETV Bharat / entertainment

'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1'चा फर्स्ट लुक टीझर रिलीज, ऋषभ शेट्टी दमदार अंदाजात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 4:52 PM IST

Kantara Chapter 1 First Look: गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटानं जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली होती. आता या चित्रपटाचा प्रीक्वल येतोय, ज्याचा फर्स्ट लूक टीझर आज 27 नोव्हेंबरला रिलीज करण्यात आला आहे.

Kantara Chapter 1 First Look
कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1

मुंबई Kantara Chapter 1 First Look : साऊथचा जबरदस्त चित्रपट 'कांतारा' हिट झाल्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण ऋषभ शेट्टीनं सोमवारी 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1' चा फर्स्ट लूक टीझर रिलीज केला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची पहिली झलक खूप दमदार आहे. 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1'मध्ये ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका आहे. आता या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पण त्यात त्याला ओळखणं फार कठीण आहे. 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1'च्या टीझरमध्ये ऋषभचा लूक थक्क करणारा आहे. ऋषभ शेट्टी टीझरमध्ये शिवासारखा दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

फर्स्ट लूक टीझर झाला रिलीज : 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1' चित्रपट प्रेक्षकांना एका अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहे. या चित्रपटाचा टीझर हा चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेकजण या चित्रपटाला ब्लॉकबस्टर असल्याचं म्हणत आहेत. शेअर केलेल्या या टीझरच्या पोस्टमध्ये एका यूजरनं लिहिलं, 'उत्कृष्ट पहिली झलक मी हा चित्रपट नक्की पाहणार' त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहिलं, 'ऋषभ शेट्टी यांनी 'कांतारा'त खूप सुंदर अभिनय केला आहे' त्यानंतर आणखी एकानं लिहिलं 'पहिल्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटामध्ये देखील नवीन काहीतरी पाहायला मिळेल, या चित्रपटाची मी आतुरतेनं वाट पाहात आहे'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

'कांतारा' 2022 मध्ये प्रदर्शित : 'कांतारा' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. 16 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की, या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 400-450 कोटींची कमाई केली. त्यानंतर ऋषभ शेट्टीला ग्लोबल स्टारचा दर्जा मिळाला. या चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टीचा अभिनय हा सर्वांनाच आवडला होता. 'कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1'चं शूटिंग डिसेंबरच्या अखेरीस सुरू होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नडा, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ आणि काजोलनंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
  2. 'अ‍ॅनिमल' प्री-रिलीज इव्हेंटसाठी रणबीर कपूरसह दिसेल 'हे' स्टार्स
  3. विकी कौशल स्टारर चित्रपट 'सॅम बहादूर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; केली 'इतकी' कमाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.