ETV Bharat / city

State Government Action : राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या 'या' व्यक्तींवर झाली कारवाई; वाचा, सविस्तर...

author img

By

Published : May 18, 2022, 8:52 PM IST

State Government Action
State Government Action

महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi government ) राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना ( Action against persons speaking state government ) चांगलाच धडा शिकवण्यात येत आहे. राज्य सरकार विरोधात जो कोणी बोलत आहे, अशा सर्व व्यक्तींविरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्हे किंवा मुंबईतील विविध ( Filing Cases in different parts of state Against opponents ) भागांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई दर्शन घडवण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - महाविकास आघाडीनेही विरोधकांवर कारवाईचा धडाका लावला. महाविकास आघाडीच्या डझनभर नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मालिक या मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले. याच केंद्र सरकारच्या कारवाईला महाविकास आघाडी सरकार जशास तसे उत्तर देताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे केंद्राच्या कारवाईला उत्तर दिले त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते. महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi government ) राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना ( Action against persons speaking state government ) चांगलाच धडा शिकवण्यात येत आहे. राज्य सरकार विरोधात जो कोणी बोलत आहे, अशा सर्व व्यक्तींविरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्हे किंवा मुंबईतील विविध ( Filing Cases in different parts of state Against opponents ) भागांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई दर्शन घडवण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महाविकास आघाडीच्या विरोधात भूमीका घेणा-या नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक होत कारवाई करताना पाहायला मिळते. पण फक्त एकच ठिकाणी कारवाई नाही तर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून कारवाई होताना पाहायला मिळते आणि मागची प्रकरणे ही काढून त्यात कारवाईचा बडगा सुरु आहे. सध्या सुरु असलेल केतकी चितळे प्रकरण, गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत.




कोणावर कसे गुन्हे दाखल झाले? :

नारायण राणे, केंद्रीय मंत्री : मुख्यमंत्री यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच शरद पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले. एवढच नाही तर राणे यांच्या बंगल्याला अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईची नोटीस पाठविण्यात आली.




ॲड. गुणरत्न सदावर्ते : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर सातारा, कोल्हापूर, आकोट आणि सोलापुरातही विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर अनेक पोलीस स्टेशनने सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी केल्याने 18 दिवस तुरुंगात राहावे लागले. यामध्ये एक वर्षापूर्वीची ही प्रकरणे उकरुन काढून त्यात कारवाई होताना पाहायला मिळाली.



राणा दाम्पत्य : मातोश्री बाहेर हनुमान चालीसा येऊन म्हणणार असल्याचे आव्हान राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिल्यानंतर दोन दिवस मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर राणा दाम्पत्याच्या विरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल 12 दिवस राणा दाम्पत्याची तुरुंगवारी करण्यात आली. एवढ्यावरच थांबले नाही तर मुंबई महानगरपालिकेला अचानक जाग आली आणि अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाईची नोटीसही पाठवण्यात आली.



अर्णब गोस्वामी : वारंवार मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात ही गुन्ह्यांची मालिका सुरु झाली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर टीआरपी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, वांद्रे येथे गर्दी जमवल्याच्या संबंध थेट मशिदी जोडल्याने गुन्हा दाखल पोलीस दलाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एवढच नाही तर विधानसभेत शिवसेना आमदारांनी अर्णब यांच्या विरोधात हक्कभंग आणला.



कंगणा रनौत : अभिनेत्री कंगणा रनौतने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्य सरकार विरोधात वक्तव्य केल्यानंतर राज्य सरकारकडून कंगणा रनौत विरोधात महापालिकेकडून कारवाई नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर रनौतने अनेकदा शिवसेनेवर टीका केली. अनेक वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हे दाखल केले. एवढच नाही तर अनेक दिवसांपासून असलेल्या कंगणाच्या कार्यालयाला नोटीस पाठवून महापालिकेने हातोडा देखील चालविण्यात आला होता. त्यानंतर कंगणा रनौतने मुंबई उच्च न्यायालयात धाव धाव घेतली असता सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


प्रवीण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते : राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे नेहमीच राज्य सरकारवर टीका करत असतात. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई बँकमध्ये फसवणूक केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली, नंतर पंधरा हजाराच्या रोख जामीनावर त्यांची सूचना देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्याविरोधात किल्ला कोर्टामध्ये 904 पाण्याचा आरोपपत्र दाखल करण्यात आले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.



देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने राज्य सरकारवर विविध आरोप लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात सुरू असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच फोन टायपिंग केला असल्याचा आरोप राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील या प्रकरणात चौकशी झालेली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई एमआयडीसी सायबर सेलकडून सुरु आहे. तसेच पोलिसांकडून न्यायालयामध्ये या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा जवाब अतिशय महत्त्वाचा असल्याचे देखील सांगण्यात आले होते. महाविकास आघाडीकडून कुठलेही व्यक्तींविरोधात आकाश चमक रित्या गुन्हे दाखल करण्यात येत नाही. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या व्यक्तीने वैयक्तिक टीकेची पातळी सोडून केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर गृह विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कारवाईला राज्य सरकार विरोधात बोलले म्हणून कारवाई करण्यात आले, असे म्हणता येणार नाही, असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.


केतकी चितळे : केतकी चितळेने शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केली आणि राज्यभरात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणी केतकीला पोलिसांनी कारवाई करून अटक ही केली. मात्र राज्याच्या विविध भागातून गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे. केतकीच्या विरोधात आतापर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. केतकी चितळेवर पहिला गुन्हा 14 मे 2022 ठाण्यातील कळवा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत.

हेही वाचा - MVA Government Failure : महाविकास आघाडी सरकार आतापर्यंत केंव्हा केंव्हा पडले तोंडघशी? वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.