ETV Bharat / city

Nitin Raut on Power Shortage Crisis : वीज पुरवठा बंद किंवा खंडित करणाऱ्या कंपन्यांना नोटीस देणार - ऊर्जा मंत्री नितीन राऊत

author img

By

Published : Apr 22, 2022, 8:59 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Uddhav Thackeray Nitin Raut Meet) आणि ऊर्जा विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आज पुन्हा एकदा राज्यातील वीज पुरवठाबाबत (Power Shortage in Maharashtra) चर्चा झाली. तसेच राज्यामध्ये सुरू असलेल्या भारनियमाबाबत देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे.

Nitin Raut
ऊर्जा मंत्री नितीन राऊत

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Uddhav Thackeray Nitin Raut Meet) आणि ऊर्जा विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आज पुन्हा एकदा राज्यातील वीज पुरवठाबाबत (Power Shortage in Maharashtra) चर्चा झाली. तसेच राज्यामध्ये सुरू असलेल्या भारनियमाबाबत देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सायंकाळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut on Electricity Shortage Crisis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कमी वीजपुरवठा आणि वीज पुरवठा खंडीत केलेल्या कंपन्यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या शासकीय निवासस्थानी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

येत्या आठ दिवसात जादा वीज मिळेल - सध्या राज्यात 27 हजार 273 मेगावॉट विजेची मागणी आहे. जे एस डब्ल्यू आणि अदानी पॉवर कंपनीने वीज पुरवठा कमी केला आहे. अदानी कंपनीकडून 3100 मेगावॅट विजेची मागणी आहे. मात्र त्यापेक्षा तेराशे ते चौदाशे मेगावॅट वीज कमी मिळत आहे. तिथेचे जे एस डब्ल्यू कंपनीचा प्लांट बंद पडल्याने शंभर मेगावॅट वीज मिळत नसल्याचे ऊर्जामंत्री यांनी माहिती दिली. त्यामुळे करार करूनही वीज देत नसल्याने संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. तर टाटा पॉवरकडून 180 मेगावॉट वीज येत्या आठ दिवसात मिळणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वीज बिल वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव नाही - मे महिन्यात विजेची मागणी वाढत असते. 29 हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी जाते. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात लोडशेडिंगची घोषणा करण्यात आली. मात्र, हळूहळू ही लोडशेडिंग कमी करण्यात येईल असे संकेत ऊर्जामंत्री यांनी यावेळी दिले. मात्र विजेची कमतरता असली तरी देखील वीज बिल वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नाकर्तेपणा झाकण्यासाठी धर्म पुढे आणला जातोय - राणा दाम्पत्या कडून सध्या सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावर बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर टीका केली. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे मुद्दे बाजूला जाण्यासाठी विरोधकांकडून धार्मिक मुद्दे समोर आणले जातात. भारतीय जनता पक्ष आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी धर्माचा वापर करत असल्याची टीकाही यावेळी नितीन राऊत यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.