ETV Bharat / city

Mumbai Lab Sealed : धक्कादायक ! मुंबईत पॅथाॅलाॅजी लॅबमधील 12 जणांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Dec 25, 2021, 11:51 PM IST

Lab in Mumbai Dadar sealed
दादर पॅथाॅलाॅजी लॅब

मुंबईत डिंसेबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai corona cases incereased )पुन्हा वाढत आहे. त्यातच आता दादरमधील एका पॅथाॅलाॅजी लॅबमधील ( mumbai dadar corona lab ) 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुर्ण लॅबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पालिकेकडून तिला सील करण्यात आले आहे.

मुंबई - मुंबईत गेल्या 24 दिवसांत 6 पट ( Mumbai Corona Cases Incereased ) रुग्णवाढ झाली असतानाच दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दादर येथील चाचणी करणाऱ्या पॅथाॅलाॅजी लॅबमध्येच ( Mumbai Dadar Corona Lab ) कोरोनाने एंन्ट्री केली आहे. येथील एका संसर्गित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने 12 जणांना याची बाधा झाली आहे. दरम्यान, संपुर्ण पॅथाॅलाॅजी लॅबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पालिकेकडून तिला सील ( Lab In Mumbai Dadar Sealed ) करण्यात आले आहे.

डॉ. लालपत पॅथॉलॉजी असे या लॅबचे नाव असून ती दादर पश्चिम येथे आहे. संबंधित पॉझिटिव्ह आलेला तरुण येथे काम करतो. शनिवारी त्याचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह ( corona taste positive ) आला होता, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची चाचणी केली होती. त्यामध्ये एकूण 12 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या 12 जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग सुरु आहे.

शुक्रवारी 11 ओमायक्रॉन रुग्ण

मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन ( Corona New Varient Omicron ) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या पॅथॉलॉजी लॅबमधील 12 पॉझिटिव्ह रुग्णांची ओमायक्रॉन चाचणी देखील करण्यात आली असून, त्यांचे सॅम्पल्स जिनोम सिक्वेनिंससाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत ओमायक्रॉन 11 ( Mumbai Omicron Cases ) बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.

मुंबईत नाईट कर्फ्यू

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबईसह राज्यात २५ डिसेंबरच्या रात्रीपासून जमावबंदी ( Night Curfew In Maharashtra ) लागू करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या काळात पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी केवळ १०० लोकांना परवानगी असेल. तर खुल्या जागेत कार्यक्रम करण्यासाठी २५० लोकांना परवानगी असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.