ETV Bharat / bharat

उंदरामुळे झाला कारचा भीषण अपघात.. एक जण जागीच ठार तर तिघे जखमी..

author img

By

Published : Apr 28, 2022, 5:32 PM IST

मध्यप्रदेशातील शहडोलच्या उमरियामध्ये चालत्या गाडीच्या डॅशबोर्डवर उंदीर आल्याने अपघात ( rat caused a car accident ) झाला. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले ( One killed in car accident MP ) आहेत.
rat caused a car accident
उंदरामुळे झाला कारचा भीषण अपघात

उमरिया ( मध्यप्रदेश ) : शहडोल विभागातील उमरिया येथे आज कार झाडाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वास्तविक, हा अपघात उंदरामुळे घडला ( rat caused a car accident ) असून, यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले ( One killed in car accident MP ) आहेत.

चांदियाहून मनेंद्रगडला जाणाऱ्या कारचा अपघात : कार मालक, त्याची पत्नी आणि दोन मुलांचे कुटुंब उमरियातील चांदिया येथून मनेंद्रगडच्या दिशेने जात असताना NH-43 वरील घुण घुटी येथील उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ हा अपघात ( umaria accident due to rat ) झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

उंदरामुळे झाला कारचा भीषण अपघात

अपघाताचे कारण बनला उंदीर : कारमध्ये लपलेला उंदीर हा अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या वेळी वेगाने असलेल्या कारमध्ये लपलेला उंदीर अचानक कारच्या डॅशबोर्डवर आला. कार चालकाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रितपणे महामार्गावरून खाली पडून जवळच्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

जखमींवर उपचार सुरू : सध्या या अपघातात रुद्राक्ष अग्रवाल या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, कार चालक, त्याची पत्नी आणि एक मूल गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शहडोल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Video : भरधाव वेगाने जाणारा ट्रक वळणावर झाला पलटी.. सीसीटीव्हीत घटना कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.