Video : भरधाव वेगाने जाणारा ट्रक वळणावर झाला पलटी.. सीसीटीव्हीत घटना कैद

By

Published : Apr 27, 2022, 3:38 PM IST

Updated : Apr 27, 2022, 3:56 PM IST

thumbnail

कोझिकोड ( केरळ ) : कोयलंडीजवळील राज्य महामार्गावर ( State Highway Near Koyilandy ) एका वळणावर भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक पलटी ( speeding truck overturned ) झाला. या घटनेची भयानक दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. भरधाव वेगात असलेल्या या ट्रकने वळणावर आल्यावरही वेग कमी केलेला नव्हता. हा ट्रक धान्यांच्या गोण्यांनी भरलेला होता. वेग जास्त असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण ( Truck crash leaving driver out of control ) सुटले आणि ट्रक पलटी ( Truck overturns in Kerala ) झाला. त्यातील धान्याचे पोते रस्त्यावर आणि बाहेर सर्वत्र पसरले होते. सुदैवाने अपघात होत असताना समोरील दिशेने एकही वाहन येत नव्हते. या अपघाताला अशास्त्रीय पद्धतीने केलेला रस्ता कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ट्रकमधील चालक आणि क्लिनर जखमी झाले ( Two Injured In Road Accident ) असून, त्यांना कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ( Kozhikode Medical College Hospital ) दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

Last Updated : Apr 27, 2022, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.