ETV Bharat / snippets

प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली,  तीन जवानांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:22 AM IST

Ahmednagar drown incident
Ahmednagar drown incident (Source- ETV Bharat Desk)

अहमदनगर- अकोले तालुक्यातील सुगावा येथून धक्कादायक घटना समोर आलीय. प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. या बोटीतील तिघे बुडाल्यानं यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. अकोलेतील सुगाव जवळची ही घटना आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं नदीत बुडून मृत्यू झाल्याचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन मदत पथकाला बचावकार्यासाठी प्रशासनाकडून पाचारण करण्यात येते. मात्र, बचावपथकाची बोट बुडून जवानांचे मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त होत आहे. प्रकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पावरा अशी मृत जवानांची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.