Rape On Student : माणुसकीला काळीमा! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Nov 10, 2023, 3:49 PM IST

Rape On Student

Rape On Student : ओडिशामध्ये एका आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलंय.

नबरंगपूर (ओडिशा) Rape On Student : ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कुंदेई भागात एका ११ वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रम शाळेच्या दोन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. सहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी शिक्षकांना ताब्यात घेतलं. ही मुलगी रायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आश्रम शाळेत शिकते.

घटनेनंतर पीडिता आजारी पडली : ही घृणास्पद घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. पीडितेनं आजारी पडल्यानंतर गुरुवारी ही बाब तिच्या पालकांसमोर उघड केली. या क्रूर घटनेनंतर पीडितेला तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलीला वैद्यकीय केंद्रात नेलं जेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र तरीही वेदना कमी न झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिला नबरंगपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेलं.

आयपीसी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : काहीतरी गडबड झाल्याची जाणीव होताच रुग्णालयातील एक परिचारिका पीडितेशी एकांतात बोलली. तेव्हा मुलीनं खुलासा केला की तिच्या शाळेच्या शौचालयात मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकानं तिच्यावर बलात्कार केला. यानंतर नर्सनं पीडितेच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. पालकांनी कुंदेई पोलिस फंदी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं : या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, पीडितेवर नबरंगपूर डीएचएचमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं पोलिसांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा :

  1. Cat Rape : माणुसकीचा अंत! मजुरानं केला चक्क मांजरीवरच बलात्कार
  2. Cab Driver Rape Attempt : धक्कादायक! धावत्या कारमध्ये चालकानं केला तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
  3. Minor Girl Rape : नातेवाईकावर विश्वास ठेवणं पडलं महागात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.