ETV Bharat / bharat

Cat Rape : माणुसकीचा अंत! मजुरानं केला चक्क मांजरीवरच बलात्कार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 7:51 PM IST

Cat Rape : उत्तराखंडमधून प्राण्यावरील अत्याचाराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेनं तिच्या भाडेकरूवर मांजरीसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केलाय. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी.

Cat Rape
Cat Rape

डेहराडून (उत्तराखंड) Cat Rape : उत्तराखंडच्या डेहराडूनमधून मानवतेला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरमालकीणीनं तिच्या भाडेकरूवर पाळीव मांजरीसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी महिलेनं आरोपी भाडेकरूविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली. महिलेच्या तक्रारीनंतर कँट पोलिसांनी आरोपी भाडेकरूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं : कँट पोलीस ठाण्यानं दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरला डाकरा येथील एका महिलेनं फिर्याद दिली. महिलेनं सांगितलं की, तिच्या घरात चार तरुण भाडेकरू म्हणून राहत होते. ३ नोव्हेंबर रोजी तीन भाडेकरू कामावर गेले. मात्र एक तरुण घरी होता. दरम्यान, महिलेला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. तेव्हा घरात उपस्थित असलेल्या भाडेकरूनं महिलेला तिची पाळीव मांजर त्याच्याकडे सोडण्यास सांगितलं. त्यानंतर महिला मांजर भाडेकरूकडे सोडून घराबाहेर गेली.

मांजरीच्या तोंडातून येत होतं रक्त : महिलेनं पुढे सांगितलं की, काही वेळाने ती परत आली आणि खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिला भाडेकरू तिच्या पाळीव मांजरीसोबत अश्लील चाळे करताना दिसला. भाडेकरूनं महिलेला पाहताच कपडे घालण्यास सुरुवात केली आणि मांजरीला दूर फेकलं. महिलेनं सांगितलं की, मांजर बेशुद्ध होती आणि तिच्या तोंडातून रक्त येत होतं. सुमारे अर्ध्या तासानंतर मांजर शुद्धीवर आली.

आरोपी मजूर म्हणून काम करतो : कॅंट पोलीस स्टेशन प्रभारी संपूर्णानंद गायरोला यांनी सांगितलं की, घरमालकाच्या तक्रारीच्या आधारे आरोपी भाडेकरू पवनकुमार पासवान याच्याविरुद्ध कलम ३७७ (अनैसर्गिक गैरवर्तन) आणि प्राणी क्रुरतेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मांजराची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आरोपी बिहारचा रहिवासी असून तो डेहराडूनमध्ये मजुरीचं काम करतो. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला ६ नोव्हेंबरला डेहराडूनमधून अटक करण्यात आली.

हेही वाचा :

  1. Father Rape Daughter : जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलीवर २ वर्ष लैंगिक अत्याचार
  2. Crime News : पतीच ठरला वैरी! फक्त पाच हजार रुपयांसाठी केला पत्नीच्या अब्रुचा सौदा
  3. Paratwada Murder Case: शेतमजूर महिलेवर 'त्याची' वाईट नजर; शेतमजूर दाम्पत्याने 'त्याला' कायमचचं संपविलं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.