Minor Girl Rape : नातेवाईकावर विश्वास ठेवणं पडलं महागात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Nov 6, 2023, 9:11 PM IST

Minor Girl Rape Case Thane

Minor Girl Rape Case Thane : नातेवाईकानं अल्पवयीन मुलीच्या विश्वासाचा भंग करत तिच्यावर ठाणे शहरातील एका सरकारी हॉस्पिटलच्या मागील पडीक खोलीत बलात्कार केला. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानं घरच्यांनी तिला रुग्णालयात नेलं असता, ती गरोदर असल्याचं समोर आलं. (Relative Raped Minor Girl) यानंतर तिनं झालेला प्रसंग घरच्यांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नातेवाईकाविरुद्ध ठाणे शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

ठाणे Minor Girl Rape Case Thane : एका साडे सोळा वर्षांच्या अल्पवयीन पीडितेला सरकारी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका पडीक खोलीत नेऊन नातेवाईकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या नराधम नातेवाईकावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच नराधम नातेवाईक फरार झालाय.

नराधमाने पीडितेच्या विश्वासाचा केला भंग : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी उल्हासनगर शहरात कुटुंबासह राहते. तर नराधम नातेवाईकही उल्हासनगर शहरात राहतो. त्यातच पीडित मुलगी ही १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मावशीकडं गेली होती. त्यानंतर नराधम नातेवाईकानं पीडितेला रस्त्यात एकटीला पाहून सरकारी हॉस्पिटलच्या मागील पडीक खोलीत घेऊन गेला. विशेष म्हणजे, दोघेही जवळचे नातेवाईक असल्यानं पीडिता त्याच्यासोबत गेली असता, त्यानं तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या पोटात दुखत असल्याने बिंग फुटलं : या घटनेनंतर नराधम नातेवाईकानं पीडितेवर दोन ते तीन वेळा बलात्कार केला. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून पीडितेच्या पोटात दुखत असल्यानं तिला नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. यावेळी पीडित मुलगी गरोदर असल्याचं समजल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम नातेवाईकावर भादंवि कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६ (२) (एन) सह पोक्सोचे कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या नातेवाईकाचा शोध सुरू केलाय.

आरोपी नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, असता, पीडित मुलगी १६ वर्ष ७ महिन्यांची असून, तिच्यावर तिच्याच जवळच्या नातेवाईकानं अत्याचार केला. त्यामुळं ती गरोदर राहिल्यानं हा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून ३ नोव्हेंबर रोजी आरोपी नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून तो फरार आहे.

हेही वाचा:

  1. Rape in Agra : भयंकर! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार; तक्रार केल्यानं गरम चिमट्यानं जाळले पीडितेचे हात
  2. Nagpur Rape Case : कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण; स्केचमुळं अखेर आरोपी अटकेत
  3. Ujjain Rape Case : उज्जैन बलात्कार प्रकरण; ५ संशयित ऑटो चालक ताब्यात, तपासासाठी 'एसआयटी' स्थापन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.