ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Europe Visit : जी-20 शिखर परिषदेपूर्वी राहुल गांधी युरोप दौऱ्यावर,

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:36 PM IST

Rahul Gandhi Europe Visit : G20 शिखर परिषदेपूर्वी राहुल गांधी तीन देशांच्या युरोप दौर्‍यावर रवाना झाले आहेत. तिथं राहुल गांधी यांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी युरोप दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली Rahul Gandhi Europe Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी रात्री उशिरा युरोपला रवाना झाले. ते 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर (5 दिवस) फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, नॉर्वे या 4 युरोपीय देशांना भेट देणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी युरोपियन युनियनमधील भारतीय समुदायातील नागरिक तसंच विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

विविध कार्यक्रमात घेणार सहभाग : काँग्रेस खासदार राहुल गांधी काल आठवडाभराच्या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. राहुल गांधी 9 तसंच 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेच्या समारोपानंतर 11 सप्टेंबरला परततील, अशी माहिती सूत्रांनी दिली. परदेश दौऱ्यादरम्यान राहुल गांधी उद्या ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियन (EU) च्या वकिलांची तसंच विद्यार्थ्यांचीही भेट घेतील. नंतर ते हेगमध्ये एका सभेला संबोधित करतील, असं सुत्रांनी सांगितलंय. तसंच राहुल गांधी 8 सप्टेंबर रोजी पॅरिसमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते फ्रान्समध्ये कामगार संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

लेबर युनियनसोबत करणार बैठक : मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बेल्जियममधील ब्रुसेल्स, नॉर्वेतील ओस्लोला भेट देणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या वकिलांच्या गटाला भेटतील. हेगमध्ये ते अशीच बैठक घेणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी राहुल गांधी दुपारी 3 वाजता पॅरिसला पोहोचतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता पॅरिसमधील विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या लेबर युनियनसोबतच्या बैठकीपूर्वी ते दुपारी आशियाई देशांतील लोकांसोबत भोजन करतील करणार आहेत.

फ्रान्सनंतर नॉर्वेला भेट देणार : फ्रान्सनंतर राहुल गांधी नॉर्वेला भेट देणार आहेत. 10 सप्टेंबर रोजी ओस्लोमध्ये स्थलांतरितांच्या कार्यक्रमाला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. 11 सप्टेंबरपर्यंत ते भारतात परतण्याची शक्यता आहे. भारतात 8 ते 9 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषद होणार आहे. त्याच दिवशी राहुल गांधी फ्रान्समध्ये चर्चा करतील. या वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. जिथं त्यांनी तेथील भारतीयांना संबोधित केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्याख्यानही दिलं होतं. अमेरिका, युरोपमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात आली होती.

असा आहे राहुल गांधींचा युरोप दौरा :

  • राहुल गांधी 7 सप्टेंबर रोजी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. अशाच प्रकारची सभा ते हेग शहरात घेणार आहेत. ते युरोपियन संसदेच्या मानवाधिकार उपसमितीचे अध्यक्ष उदो बुलमन यांच्याशीही बैठक घेणार आहेत.
  • 8 सप्टेंबर रोजी ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करतील.
  • 9 सप्टेंबर रोजी पॅरिसमध्ये फ्रेंच कामगार संघटनेच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत.
  • 10 सप्टेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारतीय समुदायाला राहुल गांधी संबोधित करतील. परराष्ट्र मंत्री विरोधी पक्षनेत्या तसंच माजी पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांची भेट घेणार आहेत. याशिवाय ते खासदार, व्यापाऱ्यांचीही बैठका घेणार आहेत.

G20 शिखर परिषद संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला राहुल गांधी भारतात परतणार आहेत. 9-10 सप्टेंबर रोजी दिल्लीत G20 शिखर परिषद होणार आहे.

हेही वाचा -

  1. Parliament Special Session : संसदेचं विशेष अधिवेशन होणार नवीन संसद भवनात
  2. Parliament Special Session : सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, पत्रातून केली 'मोठी' मागणी
  3. President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.