ETV Bharat / bharat

Parliament Special Session : सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, पत्रातून केली 'मोठी' मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 5:32 PM IST

Parliament Special Session : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, तथा लोकसभेच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनात नऊ मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

Parliament Special Session
Parliament Special Session

जयराम रमेश यांची पत्रकार परिषद

नवी दिल्ली Parliament special session : 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी पत्रातून पंतप्रधानांना केलीय. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात, सोनिया गांधींनी लिहिलं की, विरोधी पक्षांना संसदेच्या विशेष अधिवेशनात भाग घ्यायचा आहे. आम्हाला सार्वजनिक प्रश्न तसंच महत्त्वाच्या बाबी मांडण्याची संधी संसदेच्या विशेष अधिवेशनात मिळेल. मला अपेक्षा आहे की, नियमांनुसार या मुद्द्यांवर चर्चा, वादविवादासाठी विरोधकांना वेळ दिला जाईल.

विरोधकांशी चर्चा न करता अधिवेशन बोलावलं : त्यांनी पुढं लिहिलं की, संसदेचं विशेष अधिवेशन विरोधकांशी चर्चा न करता आयोजित केलं आहे. त्यामुळं आम्हाला कोणालाही अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत कल्पना नाही. 18 सप्टेंबर 2023 पासून संसदेचं विशेष पाच दिवसीय अधिवेशन बोलावलं आहे. विशेष अधिवेशन इतर राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता बोलावण्यात आलं आहे, असंही सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.

मणिपूरमधील हिंसाचाराबाबत चर्चा करा : संसदेच्या विशेष अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचारासह नऊ मुद्द्यांवर चर्चा करण्याची विनंती देखील सोनिया गांधी यांनी केली आहे. देशामध्ये जातीय तणावाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसंच चीनकडून सीमा उल्लंघनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी देखील सोनिया गांधी यांनी पत्रात केलीय.

सार्वजनिक प्रश्नांवरच चर्चा व्हायला हवी : संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत जयराम रमेश म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या मित्रपक्षांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष हटवण्यासाठी 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केलीय. या अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित केले जातील, याची आम्हाला कल्पना नाही. या विशेष अधिवेशनात आपण सहभागी होऊ, असं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. मात्र चर्चा केवळ सार्वजनिक प्रश्नांवरच व्हायला हवी, असं देखील ते म्हणाले. या अधिवेशनात एमएसपी, शेतकरी प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा व्हायला हवी, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. संसदेच्या विशेष अधिवेशनावर बहिष्कार घालणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. जनतेचे प्रश्न मांडण्याची ही आमच्यासाठी संधी असून प्रत्येक पक्ष वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करेल, असं काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Bharat Name History : ऋग्वेदापासून संविधानापर्यंत, असा आहे 'भारत'चा प्रवास; जाणून घ्या
  2. President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित
  3. Remove INDIA Word : राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची तयारी, सरकार विशेष अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.