ETV Bharat / bharat

President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:28 PM IST

Updated : Sep 5, 2023, 9:18 PM IST

President of Bharat invitation राष्ट्रपतींना पाठवलेल्या निमंत्रण पत्रावरून वाद सुरू झाला आहे. या निमंत्रण पत्रात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केलीय. तर दुसरीकडं भाजपाच्या नेत्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया या शब्दाचे समर्थन केलं.

President of Bharat invitation Sharad Pawar reaction
इंडिया भारत नाव शरद पवार आक्षेप

नवी दिल्ली President of Bharat invitation - केंद्र सरकारकडून जी-20 परिषदेनिमित्त पाठविलेल्या निमंत्रणात इंडिया हा शब्द वगळून भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून देशभरात पडसाद उमटले आहेत. देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जालना येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 28 पक्षांचा विरोधी गट असलेल्या इंडियाची बुधवारी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत भाजपाशी लढण्याकरिता इंडिया आघाडातील पक्षांच्या प्रमुखांसोबत बोलावलेल्या बैठकीत चर्चा होईल. देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे, हे मला समजत नाही. राज्यघटनेत उल्लेख असताना भारताचे नाव बदलणार का, असे विचारले असता पवार म्हणाले, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.

  • #WATCH | Bhopal, MP: On G20 Summit dinner invitations at Rashtrapati Bhawan sent in the name of ‘President of Bharat’, Congress leader Sandeep Dikshit says, "If you read our Constitution it is written 'India that is Bharat'. 'Bharat' word is prevalent in many references,… pic.twitter.com/i28ETH7FFB

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे लोक इंडिया आघाडीवर इतके नाराज आहेत. उद्या ते देशाचे नावही बदलतील? उद्या जर आम्ही नाव “भारत” ठेवले तर “भारत” हे नाव देखील बदलणार का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील

  • #WATCH | On G20 Summit dinner invitations at Rashtrapati Bhawan sent in the name of ‘President of Bharat’, Bihar Deputy CM & RJD leader Tejashwi Yadav says," Earlier, in his speeches, Modi ji used to say "Vote for India"....This shows that Modi ji is scared of INDIA. If the PM… pic.twitter.com/STKEynqF8T

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील मोदी सरकारवर टीका केलीय. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर म्हटलं की, मला देशभक्त असलेल्या राजकीय पक्षांचे अभिनंदन करायचे आहे. कारण, त्यांनी खेलो इंडिया, फिट इंडिया, मेक इन इंडिया व स्किल इंडिया अशा घोषणांमध्ये वेळ काढत ‘जुडेगा भारत-जीतेगा इंडिया’ची आठवण करून दिलीय. चीनने आपल्याकडून हिसकावून घेतलेली भूमिका भारताची आहे. तसेच काश्मीरमध्ये भोगणारा पंडित, मणिपूरमधील महिलादेखील भारतीयच आहे. आमचा लढा हा भारताच्या लोकशाहीसाठी व संविधानासाठी आहे.

  • #WATCH | DMK MP Kanimozhi on 'President of Bharat' on G20 summit dinner invitation, says, "We've never seen invitations going out in the name of 'President of Bharat', it is always been 'President of India' or Prime Minister of India'. Why have they done this now? What is the… pic.twitter.com/Pf96cwOKfO

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, आम्ही भारत आणि इंडियासाठी काम करत आहोत. तर भाजपाकडून भारत विरुद्ध इंडियाचं काम सुरू आहे. २०१४ ते २०२३ या काळात भाजपाला 'इंडिया' या शब्दाची कसलीच अडचण जाणवली नाही. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांच्या भाजपाच्या मनात नवीन द्वेष निर्माण झालाय. त्यांना वास्तव पचनी पडत नाही. मात्र, जनतेनं वास्तव स्वीकारले आहे. भाजपा सतत महागाई, बेरोजगारी, अदानी, चीन, लडाख, जम्मू काश्मीर आणि मणिपूर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • #WATCH | Rajya Sabha MP and BJP leader Sushil Modi says, "In the Constitution, both India and 'Bharat' are there. For 75 years if the President of India was written then what's the objection in writing President of 'Bharat'? We don't say 'India Mata ki Jai' but 'Bharat Mata ki… pic.twitter.com/ENiu0JGOSe

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'इंडिया' हे नाव कुठून काढणार? बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जी२० शिखर परिषदेतील निमंत्रणातून इंडिया शब्द वगळल्याबद्दल आक्षेप घेतला. तेजस्वी यादव म्हणाले, पूर्वी, मोदीजी त्यांच्या भाषणात इंडियाला मत द्या, असे म्हणत असतं. मात्र, मोदीजींना इंडियाची भीती वाटते हेच सध्या दिसून येते. पंतप्रधानांना 'इंडिया' या शब्दावर आक्षेप असेल तर त्यांचा 'भारत'वरही आक्षेप असायला पाहिजे. कारण इंडिया आघाडीची 'जुडेगा भारत, जीतेगा भारत' अशी घोषणा आहे. मोदी सरकारकडून अस्वस्थतेने निर्णय घेण्यात येत आहेत. ते 'इंडिया' हे नाव कुठून काढणार, असा टोला तेजस्वी यादव यांनी भाजपाला लगावलाय.

  • #WATCH | Congress leader Mani Shankar Iyer on BJP MP Harnath Singh Yadav's statement

    "They are scared of the INDIA alliance. Our Constitution says "India, that is Bharat"...." pic.twitter.com/UNYCTlm2Yc

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, राज्यघटनेत इंडिया हा शब्द वापरला आहे. अनेक संदर्भामध्ये इंडिया हा शब्दत महत्त्वाचा आहे. मात्र, नावाने फारसा फरक पडेल, असा वाटत नाही. भाजपाने विकास, महागाई, रोजगार व भ्रष्टाचार यावर लक्ष केंद्रित करावे.
  • डीएमके खासदार कनिमोझी म्हणाल्या, आम्ही इंडियाचे राष्ट्रपती या नावाने आमंत्रणे कधीच पाहिली नाहीत. त्यांनी आता हा बदल का केला? यामागचा हेतू व राजकारण काय आहे? इतके वर्ष इंडिया हा शब्द संविधानात आहे. पण त्याचा कोणी वापर केला नाही. आरएसएस संपूर्ण देशासाठी अजेंडा ठरवत आहे का? संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? हेदेखील आम्हाला माहित नाही.
    • #WATCH | Congress leader Mani Shankar Iyer on BJP MP Harnath Singh Yadav's statement

      "They are scared of the INDIA alliance. Our Constitution says "India, that is Bharat"...." pic.twitter.com/UNYCTlm2Yc

      — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • खासदार आणि भाजपा नेते सुशील मोदी म्हणाले, संविधानात भारत आणि 'इंडिया' दोन्ही आहेत. इंडियाचे राष्ट्रपती न लिहिता भारताचे राष्ट्रपती लिहायला काय हरकत आहे? भारत हे नावदेखील इंग्रजांनी दिले होते. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, भाजपाला इंडिया आघाडीची भीती वाटते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणतात, संविधानातदेखील भारतचा उल्लेख आहे.
  • भारताच्या अध्यक्षतेखाली 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान राजधानीत G20 शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
  • #WATCH | Congress leader Mani Shankar Iyer on BJP MP Harnath Singh Yadav's statement

    "They are scared of the INDIA alliance. Our Constitution says "India, that is Bharat"...." pic.twitter.com/UNYCTlm2Yc

    — ANI (@ANI) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा

  1. INDIA Meeting : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी
  2. Remove INDIA Word : राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची तयारी, सरकार विशेष अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता
Last Updated :Sep 5, 2023, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.