ETV Bharat / bharat

ओडिशाच्या केओंझारमध्ये व्हॅनची ट्रकला जोरदार धडक; 8 ठार, तर 12 जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 11:42 AM IST

Updated : Dec 1, 2023, 12:31 PM IST

Keonjhar Road Accident
केओंझार अपघात

Keonjhar Road Accident : ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात एका भरधाव वेगात असलेल्या व्हॅननं पार्क केलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर बारा जण गंभीर जखमी झालेत.

केओंझार Keonjhar Road Accident : ओडिशातील केओंझार जिल्ह्यात आज (1 डिसेंबर) सकाळी व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींना घाटगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सात जणांचा जागीच मृत्यू : प्राथमिक माहितीनुसार, गंजम येथील दिगपहांडी येथून केओंझार जिल्ह्यातील घाटगाव येथील तारिणी मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. तसंच यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 लोकांना घेऊन जाणारी व्हॅन समोर असलेल्या ट्रकवर आदळली. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात रुद्र गौड, बाबुला गौड, मदन गौड, बायघना गौड, लिली गौड, आकाश प्रधान आणि मीता प्रधान यांचा समावेश आहे. तर या भीषण अपघातात बारा जण जखमी झालेत. तसंच सर्व मृत गंजम जिल्ह्यातील पोदामारी गावातील असून तारिणी मंदिरापासून 3 किमी अंतरावर ही घटना घडली.

तामिळनाडूच्या अपघातात तिघांचा मृत्यू : दरम्यान, याशिवाय गुरुवारी (30 नोव्हेंबर) तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. येथे पिकअप व्हॅन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत तिघांना जीव गमवावा लागला. तर इतर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून वलपाडीकडं येणाऱ्या पिकअप व्हॅनला ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकमधील एम प्रवीण कुमार (वय 27, रा. विल्लुपुरम), सुदर्शन (40) आणि प्रकाश (52, रा. वेल्लोर) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -

  1. Odisha Bus Accident: ओडिशा परिवहन-खासगी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 12 प्रवासी ठार
  2. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू
  3. Odisha Bridge Collapsed : ओडिशात बांधकाम अर्धवट झालेला पूल कोसळला, चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू
Last Updated :Dec 1, 2023, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.