पुण्यातील वंदे मातरम् संघटनेकडून विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न - Vishal Agarwal Ink Thrown case

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 5:46 PM IST

thumbnail
विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणताना पोलीस टीम (Reporter)

पुणे Vishal Agarwal Ink Thrown Case : पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज (22 मे, 2024) पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान पुण्यातील 'वंदे मातरम्' संघटनेकडून न्यायालयात पोहोचतात विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'वंदे मातरम' संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांनी शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

तर जीव गेले नसते : याबाबत 'वंदे मातरम्' संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे म्हणाले, "त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही शाईफेक आंदोलन केलं आहे. त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने जर आपल्या मुलाला गाडी दिली नसती तर दोन निष्पाप बळी गेले नसते; पण त्यांनी गाडी दिल्यानं त्यांच्या मुलाने दोन निष्पाप मुलांचा जीव घेतला. अशा या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं."

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.