ETV Bharat / bharat

Odisha Bus Accident: ओडिशा परिवहन-खासगी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 12 प्रवासी ठार

author img

By

Published : Jun 26, 2023, 7:07 AM IST

Updated : Jun 26, 2023, 10:28 AM IST

ओडिशातील गंजाम येथे सोमवारी ओएसआरटीसी बस आणि खासगी बस यांच्यातील धडकेत किमान 12 प्रवासी ठार आणि 6 जण जखमी झाले. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडीजवळ हा भीषण रस्ता अपघात झाला.

अपघातात दहा प्रवासी ठार
अपघातात दहा प्रवासी ठार

ओडिशामध्ये दोन बसचा भीषण अपघात

भुवनेश्वर: ओडिशाच्या गंजम येथे आज भीषण अपघात झाला आहे. ओडिशाची सरकारी बस ओएसआरटीसी बस आणि खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत किमान 12 प्रवासी ठार आहेत. तर 6 जण जखमी झाले आहेत. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडीजवळ हा भीषण रस्ता अपघात झाला. अपघाताचे कारण लगेच कळू शकलेले नाही.

ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (OSRTC) बस आणि खासगी बसमधील सर्व जखमी प्रवाशांना बेरहामपूर येथील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. अपघाती तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी जिल्हास्तरीय व पोलीस अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातस्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यापूर्वी प्राथमिक उपचार करण्यात आले. रक्तस्त्राव झालेल्या गंभीर जखमी व्यक्तींच्या घटनास्थळी एकच आक्रोश होता. विदारक दृश्ये पाहायला मिळाली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघाताच्या कारणांचा शोध सुरू- खासगी बसमधील जखमी प्रवाशांची व मृत्यूंची संख्या जास्त असल्याचे सूत्राने सांगितले. ओएसआरटीसी बस रायगडाहून ओडिशाच्या राजधानी भुवनेश्वरला जात होती. राज्यातील बेरहामपूर भागातील खंडादेउली गावातून परतत असलेल्या खासगी बसमध्ये लग्नाचे वऱ्हाड जात होते. पोलीस अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. ओडिशा सरकारने उपचारासाठी प्रत्येक जखमी व्यक्तीला 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक- सर्व मृत व जखमी खासगी बसमधील आहेत. अपघाताची माहिती मिळताच आयआयसी, एसडीपीओ, एसपी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बचावपथकाने सर्व जखमींना बाहेर काढले. त्यांना ब्रह्मपूर येथील वैद्यकीय केंद्रात दाखल केले आहे. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कटक बिग मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. गंजमचे जिल्हा दंडाधिकारी दिव्यज्योत परिदा म्हणाले, आम्हाला अपघाताची माहिती मिळाली.

रात्री 1 वाजता दिगपहांडी गाव आणि डेंगोस्ता अपघात झाला. अपघातात एक बस चालक जखमी झाला, तर दुसऱ्या बसचा चालक सापडला नाही. या घटनेचा तपास सुरू आहे-पोलीस अधीक्षक डॉ. श्रावण विवेक एम

हेही वाचा-

  1. Dapoli Accident : दापोलीमध्ये भीषण अपघात, मृतांची संख्या पाचवरून आठवर पोहोचली!
  2. Vehicle Accident In Pune: उरुळी कांचनजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात; ६ गंभीर जखमी
Last Updated : Jun 26, 2023, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.