ETV Bharat / entertainment

'वेलकम 3'मध्ये 200 घोड्यांसह ॲक्शन सीन आणि 500 ​​नर्तकांसह केलं गाणं शूट - WELCOME 3

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 5:52 PM IST

Welcome 3 : अक्षय कुमारसह 25 हून अधिक कलाकार असलेल्या 'वेलकम टू द जंगल'चे दोन शेड्यूल पूर्ण झाले आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक अपडेट आली असून याबद्दल जाणून घेण्यासाठी बातमी वाचा...

Welcome 3
वेलकम 3 ('वेलकम 3' (Welcome 3 Maklers- Instagram))

मुंबई - Welcome 3 : 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामधून संजय दत्तनं माघार घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही. 'वेलकम 3' चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या 'वेलकम टू द जंगल' विनोदी चित्रपटावर काम वेगाने सुरू आहे. या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू असून दोन शेड्यूल पूर्ण झाले आहेत. दरम्यान या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'वेलकम 3' चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी मुंबईमधील शेड्यूलमध्ये 200 घोड्यांबरोबर एक ॲक्शन सीन शूट केला आहे. या ॲक्शन सीनमध्ये सर्व स्टार्स देखील उपस्थित आहेत.

गाण्यात असणार 500 डान्सर : याशिवाय त्यांनी एक गाणं देखील शूट केलं आहे. यामध्ये 500 डान्सर असल्याचं सांगण्यात येत आहे. हे डान्सर या चित्रपटामधील स्टार कास्टच्या मागे आहेत. 'वेलकम 3' चित्रपटाची निर्मिती फिरोज नाडियादवाला करत आहे. हा चित्रपट ॲक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. 'वेलकम टू द जंगल'मध्ये 25 हून अधिक कलाकार दिसणार आहेत. नुकतेच आफताब शिवदासानीनं देखील या चित्रपटात प्रवेश केला आहे. 'वेलकम टू द जंगल' ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा विचार या चित्रपटाचे निर्माते करत आहेत. त्यामुळेच या चित्रपटावर वेगानं काम सुरू आहे.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट : या चित्रपटाचं बजेट 150 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. 'वेलकम टू द जंगल'साठी अक्षय कुमारचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान आजकाल अक्षय कुमार आणि अर्शद वारसी देखील त्यांच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दोन्ही कलाकार राजस्थानमध्ये शूटिंग करत आहेत. यानंतर अक्षय आणि अर्शद 'वेलकम 3' या चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत. दरम्यान अक्षयच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तो 'धूम 4', 'हाऊसफुल 5', 'राउडी राठोड 2', 'खेल खेल में', 'सिंघम अगेन',' स्काय फोर्स',' मल्हार', 'कन्नप्पा' आणि 'सरफिरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2 द रुल'मधील 'सामी' गाणं करणार धमाका, जाणून घ्या कधी होणार रिलीज - Pushpa The Rule
  2. मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
  3. कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.