ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान;राज्यात सुट्टी जाहीर

author img

By

Published : Feb 8, 2022, 9:19 AM IST

गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळांसह सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Goa Assembly Election 2022)औद्योगिक कर्मचाऱ्यांसह खासगी व्यवस्थापनातील सर्व कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान
गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान

गोवा (पणजी) - गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राज्यात शाळांसह सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (14th February as a Public Holiday In Goa) औद्योगिक (Goa Assembly Election 2022) कर्मचाऱ्यांसह खासगी व्यवस्थापनातील सर्व कार्यालयांना सुट्टी असणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

ani twitter
ani twitter

गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू

गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

अनेकदा विधानसभा राहिली त्रिशंकू -

प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यास भाजप यशस्वी झाले. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पर्रीकर यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले, तरीही त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 17 मार्च 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि भाजप सध्या त्यांच्याबरोबर निवडणूक लढत आहे.

1987 मध्ये गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला

गोव्याच्या राजकीय इतिहासाचा विचार केला असता. 1987 मध्ये गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि प्रतापसिंह राणे हे पहिले गोव्याचे मुख्यमंत्री बनले. प्रतापसिंह राणे असताना तत्कालीन विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने विजय मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण ही विधानसभा केवळ ३ वर्षे चालली. त्यानंतर गोव्यात सहाव्या विधानसभेत 1989 मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यानंतर गोव्यात पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार बनले आणि चर्चिल अलेमाओ मुख्यमंत्री झाले.

हेही वाचा - काँग्रेस कोरोनाकाळात मदत करत होती तेव्हा मोदी टाळ्या-थाळ्या वाजवून मित्रांना देश विकत होते' - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.