ETV Bharat / bharat

Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

author img

By

Published : Aug 21, 2023, 12:58 PM IST

एका दहशतवाद्याचा खात्मा
एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रविवारी रात्री सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालंय. या चकमकीविषयीची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियासाईटवर दिलीय.

श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीची घटना घडली. सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याचा खात्मा केलाय. सुरक्षा दलाकडून या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जातेय. काश्मीर झोनच्या पोलिसांनी एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर या चकमकीची माहिती दिलीय.

दहशतवाद्यांचा शोध सुरू : पुलवामाच्या लॅरो परिगाम परिसरात चकमक होतेय. काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला कुलगाममध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 3 जवानांना वीर मरण आलं. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दलाकडून घेतला जातोय. याच दहशतवाद्यांच्या गटाकडून राजौरी आणि पुँछ येथेही हल्ला करण्यात आला होता. सुरक्षा दलाचे मुख्य अधिकारी म्हणाले की, दक्षिण काश्मीरमध्ये शोध मोहीम राबवली जातेय. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी क्वाडकॉप्टरचा वापर केला जातोय. दक्षिण काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा गट आहे. हे दहशतवादी पीर पंजाल पर्वत रांगेच्या दुसऱ्या बाजुला गेलेत. सीमा ओलांडण्याआधी त्यांना आमचा सामना करावा लागेल.

हल्ल्यांमध्ये साम्य : सुरक्षा दलाच्या जवानांना जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या संभाव्य हालचालीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी घेराबंदी करत या परिसरात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान एप्रिल महिन्यात पूँछमध्ये झालेल्या चकमकीत एकूण 5 जवानांना वीर मरण आलं. तर मे महिन्यात राजौरीमधील भट्टादुरियन हल्ल्यातही 5 जवानांना वीर मरण आलं. या वर्षाच्या सुरुवातीला राजौरी, पुँछ आणि कुलगाम या तिन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये साम्य असल्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय.

दहशतवादी गट सक्रिय : पीर पंजाल पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूला 6 ते 8 दहशतवाद्यांचा गट सक्रिय असल्याचा संशय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आहे. या गटात उच्च प्रशिक्षित परदेशी दहशतवाद्यांचा समावेश असून या दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिक अतिरेकी मदत करत असतात. या गटात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश असू शकतो. हे दहशतवादी फोनसारख्या साधनांचा वापर करत नसल्यानं रडारपासून बचाव करण्यात यशस्वी होत असल्याचं सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

हेही वाचा-

  1. JMMU AND KASHMIR :जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये शस्त्रासह 3 दहशतवाद्यांना अटक; सुरक्षा दलाची कारवाई
  2. Terrorist Encounter: सुरक्षा दलाने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; कुपवाडा आणि राजौरी भागामध्ये दोन दहशतवादी ठार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.