महाराष्ट्र

maharashtra

2014 चा 'जुमला' आता 2024 ला 'मोदी गॅरंटी'! राज्यात मोदी गॅरंटी नव्हे तर ठाकरे गॅरंटी चालते, आदित्य ठाकरेंचा दावा - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 6:34 PM IST

MLA Aditya Thackeray : 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करू असं आश्वासन दिलं. मात्र, हा चुनावी जुमला ठरला. आता मात्र मोदींच्या चुनावी जुमल्यावर जनतेला विश्वास राहिला नाही. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नव्हे तर ठाकरे गॅरंटी चालते असं ठाम मत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (19 एप्रिल) शिर्डीत मांडलं. वाचा सविस्तर वृत्त...

MLA Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे मोदी गॅरंटीवर टीका करताना

अहमदनगर (शिर्डी) :2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ अशा बाता मारल्या. नंतर त्यांनीच हा चुनावी जुमला असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. आता 2024 लोकसभा निवडणुकीत मोदी गॅरंटी नावाने 2014 चा जुमला खेळला जात आहे; मात्र या जुमला गॅरंटीवर जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याचा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (19 एप्रिल) शिर्डीत केला.

भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल :आज शुक्रवारी शिर्डी अनुसूचित जाती राखीव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतेवेळी आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख उपस्थित होते.

हा सर्व चुनावी जुमला :उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. भाजपाने 2014 ला अनेक आश्वासने दिली. हा सर्व चुनावी जुमला असल्याचं दिसून आलं. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, नोटाबंदी केली यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. देशातील अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांचे रोजगार गेले. एकूणच गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवून टाकली आहे. युवकांना रोजगार नाही. महिला सुरक्षित नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, उद्योजक अडचणीत आहेत; मात्र यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब :मोदी गॅरंटीच्या नावाखाली पुन्हा एकदा देशातील जनतेला फसवलं जाण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र जनता यावेळी त्याला फसणार नसून राज्यात आणि देशातलं भाजपाचं सरकार जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितलं. सध्या भाजपाने मोदी गॅरंटी यावर मतं मागण्यास सुरुवात केली आहे; मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये जनतेने या अगोदरच उद्धव ठाकरे गॅरंटीवर शिक्कामोर्तब केलं आहे. आमच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती केली. कोणत्याही कागदपत्रांची अनाठायी मागणी न करता सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारने केला, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

जनतेला आता मोदी गॅरंटी नकोय :उद्धव ठाकरे सरकारने कोरोना काळात लाखो जीव वाचवले. सरकारने केलेल्या कामाची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली. त्यामुळे जनतेला आता मोदी गॅरंटी नकोय तर ठाकरे यांच्या गॅरंटीवर पूर्ण विश्वास असल्याने राज्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याबद्दल शंका नसल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. चंद्रपुरात तीन वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान; मुनगंटीवारांचं कमळ फुलणार की काँग्रेस प्रतिभा राखणार? - Chandrapur Lok Sabha
  2. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 Live Update
  3. तर ठरलंय! दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा लढणार; ठाण्यात शिंदे गटानं थोपटले दंड - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details