ETV Bharat / state

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू - real brothers died

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:14 PM IST

Real Brother Death in Pune : उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी गेलेल्या दोन सख्या भावंडावर काळाने घाला घातलाय. या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू (ETV Bharat Reporter)

पुणे Real Brother Death in Pune : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिरुर तालुक्यातील पाबळ इथं मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलीय. यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही बुडाले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघं सख्खे भाऊ मंगळवारी पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडं सुट्टी लागल्यानं आले होते. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हे दोघं घराशेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्याजवळ खेळत खेळत गेले. दोघांनी पोहण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. परंतु, पोहता येत नसल्यानं व पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही शेततळ्यात बुडाले. यानंतर शेजारीच शेळ्या चारत असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी घटना पाहिल्यावर मदतीसाठी आवाज दिला. त्याठिकाणी असलेले कैलास जाधव यांनी तळ्यात उडी मारुन दोघांना बाहेर काढलं.

पोलिसांकडून तपास सुरु : दोघांनाही तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना समजाताच पाबळ व राहू इथं शोककळा पसरली. याबाबत मुलांचे मामा सचिन बाळासाहेब जाधव (35) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

नाशिकात धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 21 मे रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे. नाशिकरोड येथून रिक्षा घेऊन सर्वजण धरणावर फिरण्यासाठी आले होते.

हेही वाचा :

  1. बारवी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; बुडत्या मित्राला वाचवायला गेला अन्... - Thane News
  2. कर्ज काढून घेतली दुचाकी ; फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतून सुटला अन् तलावात पडून तरुणानं गमावला जीव - Youth Died In Pond
  3. आईला चुकवून पोहायला गेलेल्या भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, मिठी मारलेल्या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.