ETV Bharat / state

रिअल इस्टेट गुंतवणूकदारांचे 60 कोटी रुपयांचे नुकसान, EOW ने दाखल केला गुन्हा - Real Estate Fraud Mumbai

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:44 PM IST

Real Estate Fraud Mumbai : रिअल इस्टेट गुंतवणूकदारांची बिल्डरने 60 कोटी रुपयांनी नुकसान केल्याचे प्रकरण मुंबईत समोर आले आहे. याप्रकरणी फिर्यादी नरेश केसरीमल मेहता यांनी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे.

Real Estate Fraud Mumbai
फ्लॅटचे आमिष देऊन फसवणूक (reporter)

मुंबई Real Estate Fraud Mumbai : नरेश केसरीमल मेहता यांनी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीवरून ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी पवन कुमार चंदन, श्रेनिक चंदन, राजेंद्र दहिया आणि विजय कुमार संघवी यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ? : पवनकुमार चंदन यांचा बिल्ड वाइल्ड डेव्हलपर्स नावाचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. या फर्ममध्ये चंदन कुमार यांचा मुलगा श्रेणिक चंदन हा त्याचा पार्टनर आहे. पण राजेंद्र दहिया या कंपनीचे काम पाहतात. 2006 आणि 2007 मध्ये पवन कुमार आणि राजेंद्र दहिया यांनी गिरगावात चंदन हाइट्स नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यांच्याकडे प्रकल्प सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. त्यानंतर त्यांनी पवनकुमार यांच्याकडे मदत म्हणून ३ कोटी ४० लाख रुपये मागितले आणि या इमारतीतील सर्व फ्लॅट विकण्याची जबाबदारी देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने आपल्या नातेवाईकांकडून २ कोटी ४० लाख रुपये कांतिलाल शहा यांच्याकडून एक कोटी रुपये घेऊन दिले. त्याबद्दल्यात चंदन हाईट्समधले एकूण 8 फ्लॅट देण्याचे डील ठरले.

तक्रारदाराला पवनकुमारचे हे उत्तर : हा प्रकल्प सुरू झाल्यावर पवन कुमारने 2009 आणि 2010 मध्ये काही फ्लॅट विकायला सुरुवात केली. तक्रारदाराने याबाबत विचारणा केली असता ही माझी इमारत असून मी फ्लॅट विकतो, असे उत्तर दिले. त्यानंतर पवन कुमार यांच्याशी त्यांचा वाद वाढत गेला. 28 मार्च 2013 रोजी भोलाराम भागचंद बिश्नोई यांनी पीडितांची समजूत घालण्यासाठी पवन कुमारच्या कार्यालयात घेऊन गेले होते.

तक्रारदाराची 60 कोटी रुपयांनी फसवणूक : फ्लॅट विक्रीबाबत सर्वांसमोर संमती करार करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 12 फ्लॅट दिले जातील, इमारत 2022-23 मध्ये तयार होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र चार आरोपींनी सर्व फ्लॅट विकून तक्रारदाराचे 60 कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर गुंतवणूकदार असलेल्या पीडित तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आणि या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंग शानदार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. ठाकरे गटाचा EVM च्या सुरक्षेवर भरोसा नाय का? ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा' - lok sabha election 2024
  2. डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident
  3. सुरेंद्र अग्रवाल यांचं अजून एक अंडरवर्ल्ड संबंध पुढे, तुला तर मारून टाकेल, अजून एकाला दिली होती धमकी - Surendra Agarwal
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.