महाराष्ट्र

maharashtra

तब्बल 20 वर्षानंतर संजय निरुपम यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, कोणाचा करणार एन्काऊंटर ? - Sanjay Nirupam Join Shiv Sena

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 9:21 AM IST

Sanjay Nirupam Join Shiv Sena : एकेकाळी शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. "संजय निरुपम यांना संजय राऊतांना उत्तर द्यायला ठेवलं, तर राऊतांचा एन्काऊंटर होईल," असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Sanjay Nirupam Join Shiv Sena
संजय निरुपम यांचा शिवसेनेत प्रवेश (Reporter)

ठाणे Sanjay Nirupam Join Shiv Sena : एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना पक्षात घरवापसी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी ठाण्यात शुक्रवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस पक्षानं लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर संजय निरुपम हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करताना थेट राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं होतं. संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसनेते पक्षप्रवक्ते म्हणून काम करणार आहेत. सकाळी उबाठाच्या संजय राऊतांना उत्तर द्यायला ठेवलं तर राऊतांचा एन्काऊंटर होईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

संजय निरुपम यांचा शिवसेनेत प्रवेश (Reporter)

संजय निरुपम हे शिवसेनेत पक्ष प्रवक्ते म्हणून काम करणार आहेत. सकाळी उबाठाच्या संजय राऊत यांना उत्तर द्यायला निरूपम यांना ठेवलं, तर राऊत यांचा बोलण्यात एन्काउंटर होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संजय निरुपम यांचा शिवसेनेत प्रवेश :काँग्रेसवासी असलेले संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शुक्रवारी रात्री शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन संजय निरूपम शुक्रवारी ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी निरुपम यांचं जाहीर अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, संजय निरुपम यांना लोकसभा लढवायची होती. त्यांनी माझ्याबरोबर चर्चा देखील केली होती. परंतु त्यांना उमेदवार निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं. तसेच पक्षासाठी आपण काम करावं, असंही सांगण्यात आलं. त्यांनी तशी तयारी दर्शविली असुन पक्षाचे प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून ते काम पाहतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पक्षात येताना त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रवेश केला. यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

20 वर्षानंतर स्वगृही परतलो - संजय निरुपम :20 वर्षानंतर मी आज पत्नी आणि इतर पदाधिकाऱ्यांसह स्वगृही परतलो, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली. "काँग्रेसमध्ये असतानाही बाळासाहेबांच्या विचारानुसारच काम करत होतो. काँग्रेसमध्ये दगाबाजी झाली, मला लोकसभा लढवायची होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करायचे असल्यानं त्यांच्यासाठी काम करेन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. संजय निरुपम लोकसभा निवडणुकीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत; चैत्र नवरात्रीला करणार पुढील राजकीय प्रवासाची घोषणा - Lok Sabha Election 2024
  2. संजय निरुपम यांचा सुपारी घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव, आनंद दुबे यांचा आरोप - Amol Kirtikar Khichdi Scam
  3. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam

ABOUT THE AUTHOR

...view details