ETV Bharat / state

संजय निरुपम यांचा सुपारी घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव, आनंद दुबे यांचा आरोप - Amol Kirtikar Khichdi Scam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 5:40 PM IST

Shivsena Leader Anand Dubey
आनंद दुबे यांचा आरोप

Shivsena Leader Anand Dubey : कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि पक्ष यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2020 मध्ये घडलेल्या खिचडी घोटाळ्याचा ते आता उल्लेख करत आहेत, असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिलं आहे.

संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आनंद दुबे

मुंबई Shivsena Leader Anand Dubey : काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेले माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि पक्ष यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या घोटाळ्याचा ते उल्लेख करत आहे तो 2020 चा प्रकार आहे. मात्र, यांना आता जाग आली आहे ती केवळ राजकीय फायद्यासाठी. म्हणूनच संजय राऊत यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिले आहे.


अमोल कीर्तिकर विरुद्ध खिचडी घोटाळ्याचा आरोप : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात खिचडी घोटाळ्यातील चोर म्हणून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप सुरू केले आहेत; मात्र संजय निरुपम यांनी आज आपला मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला आहे.

संजय राऊतच मुख्य आरोपी : 2020 मध्ये कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांचे नाव समोर आले असले आणि त्यांची ईडी चौकशी सुरू असली तरी प्रत्यक्षात या घोटाळ्याचा सूत्रधार संजय राऊत आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. संजय राऊत यांना अटक व्हायला हवी. त्यांची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल. त्यामुळे ईडीने संजय राऊत यांची या प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी संजय निरुपम यांनी आज (8 एप्रिल) पत्रकार परिषदेद्वारे केली.


सुपारी घेऊन बदनाम करण्याचा डाव- दुबे : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, संजय निरुपम यांचा हा केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संजय राऊत यांना बदनाम करण्याचा डाव आहे. 2020 मध्ये जी घटना घडली आहे त्या संदर्भात 2024 मध्ये संजय निरुपम यांना जाग आली आहे. त्यामुळे केवळ कोणाची तरी सुपारी घेऊन आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा निरुपम यांचा हा डाव आहे. हे सर्व आरोप खोटे असून केवळ राजकीय अभिनिवेशापोटी केले गेले आहेत, हे स्पष्ट दिसत आहे; मात्र या सर्व प्रकारामुळे आम्ही अजिबात घाबरणार नाही. त्यांनी कितीही आरोप केले तरी आम्ही त्यांच्या या बदनामीला घाबरत नाही. मुंबईकर आणि मुंबईतल्या सर्व जनतेला आम्ही विनंती करत आहोत की, तुम्ही पहा कशा पद्धतीनं पक्ष फोडले जात आहेत, कशा पद्धतीनं टीका केली जात आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला या अशा लोकांना मुंबई बाहेर हद्दपार करायला पाहिजे. "अबकी बार, भाजपा तडीपार" हेच जनतेने लक्षात ठेवावे, असंही दुबे म्हणाले.

हेही वाचा:

  1. महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये पहिली सभा घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी केली सोशल मीडियात पोस्ट, "म्हटले... - PM Modi Chandrapur Rally
  2. पानठेल्यावर सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना - Nagpur Murder News
  3. वाघाच्या भूमीत घुमणार मोदींचा आवाज, जाणून घ्या भाजपासाठी का महत्वाची आहे चंद्रपूर लोकसभा - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.