महाराष्ट्र

maharashtra

कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल... - Kangana Ranaut Birthday

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 12:49 PM IST

Kangana Ranaut Birthday : अभिनेत्री कंगना रणौत आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

Kangana Ranaut Birthday
कंगना राणौतचा वाढदिवस

मुंबई - Kangana Ranaut Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीची क्वीन' कंगना रणौत आज 23 मार्च रोजी 37वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगना रणौत हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या वादग्रस्त विधानामुळे खूप चर्चेत असते. कंगना तिच्या दमदार अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे. आज तिला या विशेष प्रसंगी तिचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान कंगना अनेकदा नेपोटिजमवर बोलताना दिसते. तिनं अनेकदा करण जोहरवर नेपोटिजमचे आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तर हा विषय खूप पेटला होता.

कंगना रणौत 18 वर्षांची कारकीर्द : 2006 मध्ये गँगस्टर चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री करणारी कंगनाला आज इंडस्ट्रीमध्ये येऊन 18 वर्षे झाली आहेत. या 18 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये कंगनानं अनेक हिट आणि अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. गेल्या चार वर्षात कंगना रणौतनं 5 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत, ज्यात 'तेजस', 'धाकड', मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, चंद्रमुखी सारखे चित्रपट आहेत. कंगना शेवटी 'तेजस' (2023) चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये झपाट्यानं यश कमावणारी कंगनाचं फिल्मी करिअर फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

कंगनाचा आगामी चित्रपट : कंगना रणौतचा पुढील चित्रपट 'इमरजेंसी' आहे. हा चित्रपट पॉलिटिकल ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाच प्रदर्शन 14 जून 2024 रोजी होणार आहे. 'इमरजेंसी' चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगना रणौतचा हा चित्रपटही फ्लॉप झाला, तर तिला चित्रपटपटसृष्टीत चित्रपट मिळणे कठीण होईल.

कंगना रणौत राजकारणात करेल एंट्री ? :कंगना रणौतच्या वडिलांनी एक संवादादरम्यान सांगितलं होत की ती भारतीय राजकारणात प्रवेश करेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि आता उमेदवारांची यादी येणे बाकी आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंग आणि कियारा अडवाणीच्या 'डॉन 3' चे कधी सुरू होणार शूटिंग? - Don 3 to Go on Floors
  2. 'मडगाव एक्स्प्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नं रिलीज पहिल्या दिवशी किती कमाई केली घ्या जाणून - Box office collection day 1
  3. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' स्क्रिनिंगमध्ये पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे - Ankita Lokhande Lashes out at Paps

ABOUT THE AUTHOR

...view details