ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग आणि कियारा अडवाणीच्या 'डॉन 3' चे कधी सुरू होणार शूटिंग? - Don 3 to Go on Floors

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 11:11 AM IST

Don 3 to Go on Floors : हिंदी चित्रपटसृष्टीत 'डॉन' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची खूप प्रतीक्षा सुरू आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अलिकडच्या अपडेटनुसार या चित्रपटाचं शूटिंगचं वेळापत्रक तयार झालं आहे.

Ranveer Singh and Kiara Advani
रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी

मुंबई - Don 3 to Go on Floors : 'डॉन 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग नव्या काळाचा डॉन साकारण्यासाठी सज्ज होत आहे. एक चतुर, साहसी, स्टायलिश हँडसम डॉन होऊन तो प्रेक्षकांना भुरळ घालू शकतो असा निर्मात्यासह प्रेक्षकांनाही आहे. कियारा अडवाणीचीही भूमिका असलेल्या या चित्रपटाचं सध्या प्री प्रॉडक्शन सुरू आहे. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी एकेकाळी साकारलेल्या प्रतिष्ठित पात्रांची करामत पुन्हा रणवीर आणि कियारांच्या साक्षीनं पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सर्वात लेटेस्ट अपडेटवरून असे दिसून आले आहे की चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'डॉन 3' चित्रपटच्या शूटिंगच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी 2025 मध्ये याच्या प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात होईल. दरम्यान, चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तर याने यापूर्वी मीडियासमोर स्पष्ट केले होते की त्याने अभिनेता म्हणून एक चित्रपट करायचे ठरवले आहे आणि याचे शूटिंग यावर्षी जुलैमध्ये सुरू होणार आहे.

'डॉन 3' हा डॉन फ्रँचायझीमधील खूप प्रतीक्षेत असलेला तिसरा भाग आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'डॉन' या नावानं 2006 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खान 'डॉन'च्या भूमिकेत होता आणि अर्जुन रामपाल, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर 2011 मध्ये 'डॉन'चा दुसरा सीक्वेल प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खानसह प्रियांका चोप्रा, बोमन इराणी, ओम पुरी यांच्या भूमिका होत्या. आता या चित्रपटाच्या नवीन भागात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत उतरणार आहे, तर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.

रणवीर सिंगच्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'सिंघम 3' चा समावेश आहे. हा चित्रपट सिंघम फ्रँचायझीमधील तिसरा सीक्वेल आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात, रणवीर इन्स्पेक्टर संग्राम भालेराव उर्फ सिम्बाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे, तर करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही यात भूमिका आहेत. 'सिंघम 3' यावर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' स्क्रिनिंगमध्ये पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे - Ankita Lokhande Lashes out at Paps
  2. 'मडगाव एक्स्प्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नं रिलीज पहिल्या दिवशी किती कमाई केली घ्या जाणून - Box office collection day 1
  3. कार्तिक आर्यनने शेअर केली 'भूल भुलैया 3' शूटची झलक, विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठीही होतोय सज्ज - Kartik in Bhool Bhulaiyaa 3
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.