महाराष्ट्र

maharashtra

दिल्लीत पुन्हा 'आप' सरकार हा महाराष्ट्रातील सत्तांतराचा परिणाम - अनिल परब

By

Published : Feb 11, 2020, 1:27 PM IST

दिल्लीत आपची सत्ता उलटवण्यासाठी भाजपने दिग्गज नेते उतरवले. मात्र, तरीदेखील त्यांचा पराभव झाला. यात पुढील भविष्याची दिशा दिसत आहे. भाजपचा अहंकार लोक उतरवतात हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्याप्रमाणे देशालाही वेगळा पर्याय मिळेल, असे मंत्री अनिल परब म्हणाले.
minister anil parab
अनिल परब, परिवहन मंत्री

मुंबई - भाजपचे प्रमुख केंद्र दिल्लीत आहे, असे असतानाही आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. याचा अर्थ म्हणजे भाजपला दिल्लीतील जनतेने नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही त्याचा परिणाम दिसत असल्याचेही ते म्हणाले.

अनिल परब, परिवहन मंत्री

पुढे ते म्हणाले, दिल्लीत आपची सत्ता उलटविण्यासाठी भाजपने दिग्गज नेते उतरवले. मात्र, तरीदेखील त्यांचा पराभव झाला. यात पुढील भविष्याची दिशा दिसत आहे. तसेच दिल्लीत बसणाऱ्या लोकांनाच तेथील जनतेने नाकारले गेले, असे आम्ही मानतो. भाजपचा अहंकार लोक उतरवतात हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्याप्रमाणे देशालाही वेगळा पर्याय मिळेल, असेही मंत्री अनिल परब म्हणाले.

हेही वाचा - #DelhiElections2020Live : 'आप'ने ५, तर भाजपने 1 जागा जिंकली; बाकी ६४ मतदारसंघांपैकी आप ५२ तर भाजप १२ जागांवर पुढे

दरम्यान, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यात आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. निवडणुकीत ५९३ पुरुष उमेदवार आणि ७९ महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मतदानानंतर सर्व मतदानोत्तर चाचण्यांनीही (एक्सिट्स पोल) आम आदमी पक्षाला बहुमत येईल, असे चित्र दाखविले होते.

Intro:
मुंबई -भाजपचे प्रमुख केंद्र दिल्लीत असतानाही त्यांचा पराभव आपने केलाय. भाजपला दिल्लीतील जनतेने नाकारलं आहे अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांनी दिल्लीतील आपच्या निकालावर दिली.
राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळं देशातही ते घडतंय. Body:दिल्लीत आपची सत्ता उलटवण्यासाठी भाजपने दिग्गज नेते उतरवूनही त्यांचा पराभव झाला. यातच पुढील भविष्याची दिशा दिसतंय.
दिल्लीत बसणाऱ्या लोकांनाच जनतेने नाकारले गेलंय, असं आम्ही मानतो. भाजपचा अहंकार लोक उतरवतात हे आजच्या निकालातून स्पष्ट झालंय. राज्याप्रमाणे देशालाही पर्याय मिळेल असे अनिल परब म्हणाले.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details